मोहाडी तालुक्यात घरकुलच्या नावावर वाळूची लूट दोन ट्रॅक्टर कारधा पोलिसांनी पकडले

मोहाडी:- तालुक्यात घरकुलधारकांना नदीपात्रातील वाळूचे मोफत वाटप सुरू आहे. या संधीचा लाभ घेऊन वाळू चोरांनी घरकुल धारकांच्या नावावर अवैध वाळू चोरी सुरू केली आहे. याची माहिती कारधा पोलिसांना झाली आणि त्यांनी
नवेगाव (कोका) गावाजवळ २ ट्रॅक्टर पकडून पोलिस स्टेशनमध्ये जमा केले. मात्र करडी पोलिस अर्थकारण व चोरांना सहकार्य करण्यातच व्यस्त राहिले.
मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा, निलज (बु), रोहा या वाळू घाटांवरून दि.१ जुन पासून
दि.९ जुन पर्यंत घरकुल धारकांना वाळू मोफत देण्याची योजना सुरू केली. या योजनेचे उद्धघाटन आ. राजू कारेमोरे यांच्या हस्ते दि. ३१ मे रोजी झाले व घरकुल लाभाथ्यर्थ्यांच्या नावावर वाळू चोरण्यासाठी वाळू चोरांना रान मोकळे झाले.
ढिवरवाडा व निलज वाळू घाटावरून मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्याचे सत्र सुरू आहे. ज्यांचे घर पूर्णत्वास आले त्यांनी सुद्धा आपले आधार कार्ड या वाळू चोरांच्या हातात दिले. या वाळू चोरांनी त्याचा फायदा घेत व कर्मचाऱ्यांची कमतरता बघून पहिली ट्रिप रॉयल्टीची मारायची व त्यानंतरच्या ट्रिप कर्मचाऱ्यांच्या मागे गोंधळ
घालून त्यांना चकवा देऊन दुसऱ्या मार्गाने रॉयल्टी न फाडता ट्रॅक्टर घेऊन पळायचे. कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला तर आमदारांना कर्मचाऱ्यांची खोटी तक्रार करायची. पण मी चोर आहे असे सांगायचे नाही, याची माहिती करडीचे ठाणेदार, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांना देण्यात आली. मात्र ते दुर्लक्ष करीत आहेत.
बोंडे, कोका, इंजेवाडा, सर्पेवाडा या परिसरात अवैध वाळू भरून ट्रॅक्टर जात आहेत अशी माहिती एका पोलिस कर्मचाऱ्यास देण्यात आली. तो पोलिस कर्मचारी बोंडे शेतशिवारात गेला व उलट वाळू चोरास फोन करून सांगितले
की तुम्ही इकडे येऊ नका. तुमच्या मागे कुणी तरी लागले आहेत, असे सांगितले व स्वतः तेथून निघून से गेला. ही बाब दुपारी कारधा पोलिसांना सांगण्यात आली. त्यांनी के करडी पोलिस स्टेशनच्या सिमेनंतर सापळा रचला व नवेगाव (कोका) गावाजवळ विना परवाना वाळू वाहून नेणारे एम एच.३६ झेड३४१० व एम एच. ३६ ए.एल. ८२५१ या क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर स पकडले व पोलीस स्टेशन कारधा येथे जमा केले. सदर कारवाई क ठाणेदार गणेश पिसाळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नवल नि किशोर इंगळे, हेड कॉन्स्टेबल दिलीप धावडे, त्र्यंबक गायधने, सुरेश सिडाम, जितेंद्र, सचिन बावनकुळे, मिश्रा यांनी पार नि पाडली.