नागपुर पर्यावरण महाराष्ट्र हेडलाइन

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण गरजेचे वृक्ष संवर्धन काळाची गरज धनंजय बोरीकर

Summary

कोंढाळी- माझी वसुंधरा अभियान 6.0अंतर्गत वर्ष 2025/26 वृक्ष संवर्धनाचे लक्ष असुन या लक्ष पुर्ती करिता 5जून जागतिक पर्यावरण दिनी नगर पंचायत कोंढाळी चे वतीने येथील वार्ड क्रं सहा चे शिक्षक वसाहतीचे श्री संत गजानन महाराज मंदिराचे खुल्या प्रांगणात तसेच वार्ड […]

कोंढाळी-
माझी वसुंधरा अभियान 6.0अंतर्गत वर्ष 2025/26 वृक्ष संवर्धनाचे लक्ष असुन या लक्ष पुर्ती करिता 5जून जागतिक पर्यावरण दिनी नगर पंचायत कोंढाळी चे वतीने येथील वार्ड क्रं सहा चे शिक्षक वसाहतीचे श्री संत गजानन महाराज मंदिराचे खुल्या प्रांगणात तसेच वार्ड क्रं दोन चे देशमुख ले आऊट चे सार्वजनिक उपयोगासाठी वापर असलेल्या प्रांगणात नगर पंचायतीचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक युवक,युवती व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कोंढाळी नगर पंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी ही वृक्षारोपण करुन पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
वृक्षारोपणा सह वृक्ष संवर्धन गरजेचे
कोंढाळी नगर पंचायत अंतर्गत घेण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी नगर पंचायतीचे प्रशासक धनंजय बोरीकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर संदेशात सांगितले की
वृक्षारोपण हा पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आणि जागतिक पर्यावरण दिनी या उपक्रमाला विशेष महत्त्व दिले जाते. या उपक्रमाद्वारे लोकांना पर्यावरणाचे महत्त्व आणि वृक्षारोपणाचे फायदे समजावून सांगितले. सोबतच प्रशासक धनंजय बोरीकर यांनी सांगितले की पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण फारच गरजेचे, त्यापेक्षाही वृक्षसंवर्धन जास्त गरजे चे काळाची गरज आहे असे सांगितले.
नगर पंचायत समितीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी कोंढाळी नगर पंचायती क्षेत्रातील, जनप्रतिनिधींनी, ज्येष्ठ नागरिक,युवक,नगर पंचायतीचे अधिकारी कर्मचारी,– उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *