वरठी ग्रामसेवकाचा ठेकेदारी कामगाराच्या अनुभव पत्रावर स्वाक्षरीस नकार – कामगारांचे प्रश्न ऐरणीवर
Summary
वरठी (ता. मोहाडी, जि. भंडारा) – बांधकाम ठेकेदाराच्या हाताखाली ९० दिवस प्रामाणिकपणे काम केल्यानंतरही संबंधित मजुराला ग्रामपंचायतीकडून अनुभव प्रमाणपत्रावर स्वाक्षरी मिळत नसल्याने कामगारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. वरठी गावातील ग्रामसेवक अनुभव प्रमाणपत्रावर स्वाक्षरी देण्यास नकार देत असल्याचा आरोप स्थानिक कामगारांनी केला […]

वरठी (ता. मोहाडी, जि. भंडारा) – बांधकाम ठेकेदाराच्या हाताखाली ९० दिवस प्रामाणिकपणे काम केल्यानंतरही संबंधित मजुराला ग्रामपंचायतीकडून अनुभव प्रमाणपत्रावर स्वाक्षरी मिळत नसल्याने कामगारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. वरठी गावातील ग्रामसेवक अनुभव प्रमाणपत्रावर स्वाक्षरी देण्यास नकार देत असल्याचा आरोप स्थानिक कामगारांनी केला आहे.
संबंधित कामगाराने सांगितले की, “मी ठेकेदाराच्या मार्गदर्शनाखाली ९० दिवस बांधकामाचे काम केले असून, त्याचा अनुभव फॉर्म भरून सादर केला आहे. मात्र ग्रामसेवक स्वाक्षरी टाळत आहेत. यामुळे पुढील नोकरीच्या संधी आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यात अडथळा निर्माण होत आहे.”
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ग्रामसेवकांच्या वागणुकीमुळे अनेक गरजू मजुरांचे नुकसान होत आहे. काहींनी सांगितले की, “हे अनुभव प्रमाणपत्र केवळ कामगारांच्या प्रामाणिक कामाचे पुरावे आहेत. जर तेच मिळाले नाहीत, तर आमचं भवितव्य अंधारात जातं.”
या संदर्भात ग्रामसेवक दिगंबर गभने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. काही कार्यकर्त्यांनी यासंबंधी तालुका प्रशासनाकडे तक्रार देण्याची तयारी दर्शवली आहे.
कामगार हक्क संघटनांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.