★ *ओबीसींच्या १० हजार विद्यार्थ्यांना JEE/MH-CET/NEET प्रवेशासाठी “महाज्योती” अंतर्गत निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण*
● या वर्षी ११ वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी २५ डिसेंबर पर्यंत महाज्योतीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी
—डॉ. बबनराव तायवाडे,संचालक, महाज्योती
~ महाराष्ट्र शासनाने ओबीसी साठी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची ची निर्मिती केली आहे.
~ १२ वी नंतर इंजिनिअर,मेडीकल, आयआयटी अशा व ईतर महत्वाच्या शासकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा जेईई स्पर्धा परीक्षेचे महागडे कोचिंग क्लास लावण्याची आर्थिक कुवत ही ओबीसी ,भटके व विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नसते.ही बाब लक्षात घेवुन “महाज्योतीने” २०२२ मध्ये होणार्या या स्पर्धा परीक्षेसाठी ओबीसींच्या १० हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा व त्यांची या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.
~११ वी विज्ञान शाखेत शिकणार्या ओबीसी,वीजेएन टी ,एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जावुन यासाठी २५ डिसेंबर २०२० पर्यंत नोंदणी करावयाची आहे.
~या महाज्योती प्रशिक्षण कार्यक्रमात या मोफत प्रशिक्षणासाठी आॅनलाईन व्हर्च्युअल माडर्न क्लास रूमच्या माध्यमातून तज्ञ व अनुभवी प्राध्यापकाकडून नियमित प्रशिक्षण देण्यात येत आहेत.
निवडलेलया १० हजार पात्र विद्यार्थ्यांना, शासनाकडुन महाज्योतीला निधी प्राप्त झाल्यावर मोफत टॅब,स्पर्धा परीक्षेची पुस्तके व शैक्षणिक साहित्य व ईतर सर्व मदत देण्याची योजना आहेत.
~ ओबीसी विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी ही योजना ओबीसी समाजापर्यंत पोहचवावी असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रा.अध्यक्ष व महाज्योतीचे संचालक मा. डॉ. बबनराव तायवाडे सरांनी केले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ
🪀 9527780099
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा शेषराव येलेकर