BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळी येथे बाल वारकरी सुसंस्कार शिबिर संपन्न सुसंस्कार शिबिरात मातृ पितृ वंदना संस्कार बाल वारकरी सुसंस्कार शिबिराचे प्रशिक्षक व बाल वारकरी व उत्कृष्ट सेवा देणारे अधिकारी पुरस्कृत

Summary

कोंढाळी- धर्म उत्सव नगरी कोंढाळी येथील श्री संत गजानन महाराज ध्यान मंदिर कोंढाळी यांच्या वतीने 5 ते 15 मे दरम्यान बालवारकरी सुसंस्कार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या बाल सांस्कृतिक शिबिरात काकडा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, संगीत आणि बौद्धिक (धार्मिक) अभ्यास, […]

कोंढाळी-
धर्म उत्सव नगरी कोंढाळी येथील
श्री संत गजानन महाराज ध्यान मंदिर कोंढाळी यांच्या वतीने 5 ते 15 मे दरम्यान बालवारकरी सुसंस्कार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या बाल सांस्कृतिक शिबिरात काकडा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, संगीत आणि बौद्धिक (धार्मिक) अभ्यास, तसेच मातृ पितृ वंदना संस्काराचे प्रशिक्षण देण्यात आले. जीवन विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर च्या श्री संत गजानन महाराज नगरी परिसरात
आध्यात्मिक वारकरी बालसुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे मुख्य प्रशिक्षक ह भ प गौरव महाराज मोहोड (अमरावती), सहप्रशिक्षक ह भ प समाधान महाराज पवार (अकोला) यांच्या हस्ते जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन जंवजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रसिद्ध कीर्तन गायक ह भ प.पंकज महाराज पोहोकर यांचे उपस्थित श्री संत गजानन नगरी, तरोडा रोड, कोंढाळी,येथे 5 ते 15 मे. या प्रशिक्षणादरम्यान बाल वारकऱ्यांना निवास व्यवस्था करण्यात आली होती. जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे अध्यक्ष जीवन जनवजल यांनी ही माहिती दिली आहे.
*श्री माऊलींची पालखी*
बाल वारकरी सुसंस्कार शिबिराच्या समारोपाच्या दिवशी, श्री संत गजानन महाराज नगरीमध्ये 40बाल वारकऱ्यांनी टाळ, मृदंग,आणि वीणा वाद्य्या सह, टाळ्यांच्या गजरात श्री संत गजानन महाराज, श्री संत साई बाबा आणि आई तुळजा भवानीच्या जयघोषात भव्य दिव्य‌ श्री माऊली गजानन महाराजाची पालखी शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली होती.
या शोभायात्रेत हजारो पुरुष आणि महिला भाविक सहभागी झाले होते.
* *मातृ पितृ वंदना संस्कार पूजन*
बाल वारकरी सुसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभाच्या निमित्ताने मातृ-पितृ वंदना संस्कार आयोजित करण्यात आला. या बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजक, जीवन आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर येथील अध्यक्ष जीवन जंवजाळ यांनी आपल्या शेतकरी आई वडिलांची मातृ पितृ पूजन केले आणि जीवन जंवजाळ यांनी रमेशराव जंवजाळ व सुरेखाताई यांना आपल्या (आई वडिलांना) शेतावर जाण्यासाठी महागडी कार भेट देऊन मातृ-पितृ वंदना संस्कार पूर्ण झाला.
उत्कृष्ट सेवा देणारे पोलीस अधिकार्यांचा ही सत्कार
कोंढाळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख हे अत्यंत दुर्गम नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली जिल्ह्यात तैनात होते, तेव्हा त्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस विभागाने सन्मानित केले.याची‌ दखल घेत वारकरी बालसंस्कार शिबिराच्या निमित्ताने बाल वारकर्यां समक्ष जीवन आधार बहुउद्देशीय संस्था, श्री संत गजानन महाराज ध्यान मंदिर आणि शालिनीती मेघे फाऊंडेशनच्या वतीने गडचिरोली सारख्या दुर्गम भागात उत्कृष्ट सेवा दिल्या बाबद पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांचा उपस्थित हजारो भाविकांचे उपस्थित सत्कार करण्यात आला.
या शिवाय, ह.भ.प. प्रसिद्ध कीर्तनकार पंकज महाराज पोहेकर, ह.भ.प. समाधान महाराज पवार आणि शिबिरात प्रशिक्षित झालेल्या 40 बाल वारकऱ्यांचा पुरस्कार करण्यातआला. या प्रसंगी महाप्रसादाचा ही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *