महाराष्ट्र विद्यालय , खापरखेडा येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
महाराष्ट्र विद्यालय , खापरखेडा येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश! खापरखेडा: – येथील महाराष्ट्र विद्यालयाचा एस एस सी बोर्डाचा निकाल 94.5 टक्के लागला असून शाळेतील कु प्रिती रामकीशोर डिब्बे ही 87.2 टक्के गुणासह प्रथम, कु प्रतीक्षा प्रल्हाद देवगडे 82.2 टक्के गुणासह द्वितीय तर हर्ष खुशाल मोहनकर 81.4 टक्के गुणासह तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष माजी मंत्री सुनीलबाबू केदार, संस्था सचिव सुहासताई केदार तसेच इतर संस्था सभासदांनी अभिनंदन केले. शाळेचे प्राचार्य अरुण वडस्कर, उपप्राचार्य चंद्रशेखर लिखार, शिक्षक प्रतिनिधी अभय पुल्लीवार, गुणेश्वर गजभिये, विनोद बागडे, संजीव शिंदे, सुनील तांबडे, मनीषा खापरे, जयश्री खेताडे, स्मिता गिरी, मिलिंद डोंगरे इ, च्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व मिठाईचे वाटप करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
