सरस्वती विद्यालयाची निसर्ग सहल

अर्जुनी मोर.:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर येथील राष्ट्रीय हरित सेना योजने तर्फे वर्ग नववीच्या हरित सेना विद्यार्थ्यांची निसर्ग सहल नवेगाव ,नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र अंतर्गत नवेगाव राष्ट्रीय उद्यान येथे दिनांक 28 एप्रिल सोमवारला आयोजित करण्यात आली. यामध्ये हरित सेनेचे 40 विद्यार्थी व पाच शिक्षक सहभागी होते ,या निसर्ग सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील विविध स्थळांना भेटी दिल्या. यात रानगवा, चितळ ,सांबर, नीलगाय, चौसिंगा, तसेच मोर ,सर्प गरुड ,इत्यादी विविध पशुपक्ष्यांचे विद्यार्थ्यांना दर्शन घेता आले .निसर्ग मार्गदर्शकांनी उद्यान तसेच वन्यजीवांविषयी विस्तृत माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली. निसर्ग सहलीचे आयोजन प्राचार्याच्या पूर्वपरवानगीने हरित सेना प्रभारी श्री शिवचरण राघोर्ते व ओमकार लांजेवार यांनी केले. निसर्ग सहलीच्या यशस्वीतेसाठी श्री अमर वसाके, कु. अर्चना गुरुनुले, कु .मनीषा सपाटे तसेच नवेगाव वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल प्रतिभा रामटेके मॅडम यांचे सहकार्य लाभले.