सरस्वती विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Summary
अर्जुनी मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जी.एम.बी. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शव्या जैन होत्या तर प्रमुख उपस्थिती सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक […]

अर्जुनी मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जी.एम.बी. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शव्या जैन होत्या तर प्रमुख उपस्थिती सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे, सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना भुते,प्रा.टोपेश बिसेन यांची होती. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. शिक्षण म्हणजे ज्ञान व विवेक यांचा सुरेख संगम होय विद्यार्थ्यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे व समाजसेवेचा वसा पुढे चालू ठेवावा असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्या शव्या जैन यांनी केले. तसेच सहाय्यक शिक्षक राजेंद्र डोंगरे, दिपेश्वरी मेंढे,कल्पना भुते, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे,प्रा. टोपेश बिसेन यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.या दिनाचे औचित्य साधून वर्ग पाच ते नऊ तसेच वर्ग अकरावीच्या विद्यार्थोनीं अखंड वाचन हा उपक्रम राबविला. कार्यक्रमाचे संचालन करून आभार ज्योत्स्ना शेळके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य केले.