कोंढाळी येथील नियती वांढरे राज्यात प्रथम भारतीय संस्कृती ज्ञान स्पर्धा 2025 राज्यात सुमारे 80 हजार परीक्षार्थीचा सहभाग

कोंढाळी – भारतीय संस्कृती ज्ञान स्पर्धा सत्र 2024- 25 मध्येस्थानिक लाखोटीया भूतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता 6 मधील नियती अंबादास वाढवे राज्यात अव्वल ठरली.
देशात शालेय स्तरावर 22 राज्य व केंद्रशासित प्रदेशात सदर परीक्षेचे सर्वात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. स्पर्धा परीक्षा पद्धतीचे ओएम आर (OMR) उत्तर पत्रिकेचा वापर परीक्षेत केल्या जातो.हे विशेष!नियतीला विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा परीक्षा समन्व्यक हरीश राठी, उपमुख्याध्यापक कैलास थुल, ज्येष्ठ पर्यवेक्षक मनोज ढाले, तिन्ही विभाग संयोजक अमोल काळे, आम्रपाली बागडे, मीनाक्षी बोन्द्रे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी, सचिव डॉ श्यामसुंदरजी लद्धड, उपाध्यक्ष रेखा राठी, संचालक राहुल लद्धड, प्राचार्य सुधीर बुटे यांनी नियतीचे सुयशाबद्दल अभिनंदन केले आहे.
—–==——-===
गायत्री शक्तिपीठ येथे पुरस्काराचे वितरण..
राज्यात आयोजित परीक्षाचे मुख्यालय गायत्री शक्तिपीठ जगनाडे चौक नागपूर येथून संपूर्ण संयोजन करण्यात येते.
नागपूर जिल्हातील यशस्वी विदयार्थ्यांना शुक्रवारला गायत्री शक्ती पीठ येथे गुणवतांचा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. याप्रसंगी पुरस्कार वितरणाला कार्यक्रमाचे अध्यक्ष सह प्रबंधक तथा विश्वस्थ डॉ पुष्पा हजारे, प्रमुख अतिथी साई इंटरनॅशनल स्कूल रामटेक प्राचार्य राजेंद्र मिश्रा, ला भु वि व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी प्राचार्य सुधीर बुटे, विनायक देशमुख कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य प्रदीप बिवटे, राज्य समन्व्यक शंकरराव भावरकर, राज्य सह समन्वयक प्रा. जयश्री काळे, जिल्हा समन्वयक वासुदेव चंदनखेडे, जिल्हा सयोजक चमू प्रामुख्याने उपस्थित होती.राज्यात सुयश प्राप्त तसेच जिल्हातील विविध गटात प्रथम, द्वितीय,तृतीय येणारे गुणवंतांना आकर्षक ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोख पुरस्कारांचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालकवर्गांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. गायत्री पूजन, मंत्र,भारतीय संस्कृती यावर मार्गदर्शन करण्यात आले होते. उत्कृष्ठ आयोजनाबद्दल उपस्थितांनी प्रसंशा केली. गुणवंतांचे कौतुक केले.कार्यक्रमांचे
संचलन वसुधा काटोरे तर आभार अर्चना सोनारे यांनी मानले.