अदानी विज निर्मिती प्रकल्पाने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्याने तिरोडा अदानी विज केंद्रासमोर आज पासुन महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेने द्वारा काम बंद आंदोलन व आमरण उपोष्ण सुरु ……..

सदानंद पि. देवगडे (पत्रकार ) : अदानी विज निर्मिती प्रकल्पाने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्याने तिरोडा अदानी विज केंद्रासमोर आज पासुन महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेने द्वारा काम बंद आंदोलन व आमरण उपोष्ण सुरु ……..
( नागपुर ) १७ मार्च २०२५ रोजी २.३० वाजता अपर कामगार आयुक्त नागपुर कार्यालया मार्फत तिरोडा अदानी विज केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या न्यायीक मागण्यावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेने द्वारा तिरोडा अदानी विज केंद्रातील कंत्राटी कामगारांना मुळ वेतनात १९ टक्के वाढ,विविध भत्यांचा पगार, किमान वेतन,उपदान,व निवेदनातील ऐकुण ऐकवीस मागण्यावर अपर कामगार आयुक्त कार्यालयात, तिरोडा अदानी विज निर्मिती व्यवस्थापनाने मागण्या मान्य न केल्याने दि.१७.०३.२०२५ रोजी ऐकुणच चर्चा विफल ठरलेली होती. शासनाने निर्देशित केलेल्या परिपत्रकानुसार, तिरोडा अदानी व्यवस्थापनाकडुन जर कामगारांना न्यायच मीळत नसेल तर अदानी व्यवस्थापनाच्या अमानवीय व बेकायदेशीर कृत्याविरोधात आंदोलन करणे हाच ऐकमेव पर्याय आहे .असे उपस्थितां समोर संघटना व कामगारांच्या ऐकमताने जाहीर करण्यात आले आहे.संघटनेच्या वतीने २० मार्च २०२५ रोजी पासुन बेमूदत आंदोलन होत असुन कामगारांना आपला न्यायीक हक्क जो पर्यंत मीळणार नाही तो पर्यंत तिरोडा अदानी विज केंद्रा समोरील आंदोलन सुरुच रहाणार आहे. असा आक्रमक पवित्रा संघटनेसह तमाम कामगार बांधवांनी घेतलेला आहे. कामगारांच्या हितार्थ
आंदोलन,मोर्चे करणे हे लोकशाहीने दीलेले प्रभावी हत्यार आहे यास कुणीही रोकु शकत नाही.ही लढाई संपूर्ण कामगारांच्या मुलभुत अधिकाराची असणार आहे.
अपर कामगार आयुक्त नागपुर यांचे समक्ष अदानी व्यवस्थापन,कंत्राटदार,तसेच संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष चैनदास भालाधरे,केंद्रीय कार्याध्यक्ष जी.एम.भालेराव,संघटनेचे तिरोडा शाखाध्यक्ष राजु बावनकर,विदर्भ अध्यक्ष भाई महेंद्र बागडे व संघटनेचे तिरोडा शाखा पदाधिकारी तसेच हजारोच्या संख्येत कामगार बांधव उपस्थित होते. तसेच संघटने कडून आज पासुन तिरोडा अदानी विज निर्मिती प्रकल्पा समोर काम बंद आंदोलन व आमरण उपोष्ण सुरु करण्यात आलेले आहे.कामगारांना न्याय मीडेपर्यंत हे आंदोलन सतत प्रखरपने सुरु राहणार आहे.