BREAKING NEWS:
विज्ञानं-तंत्रज्ञान

कोविड टेस्ट

Summary

कोविड आजाराचा सध्या  सगळीकडेच समुहसंसर्ग ( Community spread ) झाला आहे. सध्या सरकारी व खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. कधी कोणती तपासणी करावी ? कोणती तपासणी अधिक खात्रीशीर आहे ? कोणत्या तपासणीला अधिक खर्च येतो ? कोणत्या तपासणीला […]


कोविड आजाराचा सध्या  सगळीकडेच समुहसंसर्ग ( Community spread ) झाला आहे. सध्या सरकारी व खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. कधी कोणती तपासणी करावी ? कोणती तपासणी अधिक खात्रीशीर आहे ? कोणत्या तपासणीला अधिक खर्च येतो ? कोणत्या तपासणीला किती वेळ लागतो ? HRCT व त्याचा score म्हणजे काय ? Rapid antigen test आणि RT–PCR  यांच्यात फरक काय ? या सर्व गोष्टी आपण या चवथ्या कोरोणा लेखात पाहणार आहोत.
कोरोनाच्या मुख्यत: २ प्रकारच्या तपासण्या असतात1) Viral Test2) Antibody Test
कोरोनाचे निदान होण्यासाठी Antibody Test चा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही.
कोरोना निदानासाठी Viral Test  चाच मुख्यतः वापर होतो. त्याशिवाय रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास HRCT चा निदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता  समजण्यासाठी उपयोग होतो.
Viral Test या मुख्यत्वेकरुन ३ प्रकारच्या असतात.1. Rapid Antigen test2. RT–PCR3. True Nat Test
*तपासण्यांचा खाजगी लॅबमध्ये येणारा खर्च*1) Rapid Antigen test — 450 रु2) RT–PCR– 2500 रु3) True Nat Test — 1200 रु4) HRCT — 6000 — 8000 रु
*तपासण्यांसाठी लागणारा वेळ*1) Rapid Antigen test — अर्धा तास2) RT–PCR– 24 ते 48 तास3) True Nat Test — दोन ते अडीच तास4) HRCT — अर्धा ते एक तास
*कोणती तपासणी कधी करावी*
यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
*Antigen Test*a.) ज्या रुग्णांना त्वरीत उपचाराची गरज आहे त्यांच्यामध्ये
*RT–PCR*a.) ज्यांची Antigen Test ही निगेटिव्ह आली आहे पण लक्षणे असणारे पेशंट.b.) कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या contact मधील लोक.c.) परदेशातून येणारे लोक.
*True Nat Test*a.) Brought Dead व्यक्तीb.) बाळंतपणासाठी आलेल्या माताc.) Emergency Operation चे रुग्ण
( जर True Nat चाचणी उपलब्ध नसेल तर Antigen Test करावी. ) 
महाराष्ट्र शासनाने HRCT ला कोविडच्या निदानासाठी परवानगी दिलेली नाही. ही तपासणी कोविड निदानासाठी शासनातर्फे ग्राह्य मानली जात नाही.
आता सर्व तपासण्यांची विस्तारीत माहिती पाहुयात.
*Rapid Antigen Test*
१) यामध्ये विषाणूंच्या surface spike मधील antigen protein तपासले जाते.
२) यासाठी नाक व घसा येथून स्वॅब घेतला जातो.
३) या चाचणीचा रिपोर्ट आपल्याला अर्ध्या तासात समजू शकतो.
४) ही तपासणी RT–PCR तपासणी पेक्षा स्वस्त व लवकर होणारी आहे.
५) या तपासणी साठी प्रशिक्षित व्यक्तीची ( Well Trainer ) ची गरज लागत नाही.
६) तपासणी तील दोषa. कोरोना सदृशच लक्षणे असणाऱ्या फ्लू सारख्या  आजारात या तपासणीची sensitivity ही केवळ ३४ ते ८० टक्के असते. याच तर्काने अर्धे किंवा त्याहून अधिक कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते.
b. बऱ्याच Asymptomatic ( लक्षणे नसलेल्या ) पेशंट मध्ये  नाकातून व घशातून योग्य प्रमाणात विषाणू मिळत नसल्याने ही तपासणी निगेटिव्ह येवू शकतेकारण या तपासणीत antigen चे amplification केले जात नाही.
७) मग ही तपासणी का केली जाते ??a.) ज्यावेळी viral load जादा असतो त्यावेळी ही तपासणी highly sensitive असते. त्यामुळे बाधित पेशंटचे विलगीकरण करणे सोपे जाते.
b.) ही तपासणी RT–PCR पेक्षा स्वस्थ व पटकन होणारी आहे.
c.) सर्व पेशंटची RT–PCR तपासणी करणे शक्य नसते अशावेळी RT–PCR चाचण्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी.
d.) समुह संसर्ग ( Community spread ) होत असताना जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या करुन त्यानुसार पॉझिटिव्ह पेशंटचे विलगीकरण ( Isolation ) करणे व त्याअनुषंगाने रोगाचा प्रसार टाळण्यासाठी.
e.) Antigen test निगेटिव्ह येवूनही ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत अशा रुग्णांची नंतर RT–PCR तपासणी केली जाते.
f.) Antigen मशिन हे Treu Nat मशिनच्या तुलनेत स्वस्त असते व या मशिनवर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तपासण्या करणे शक्य असते.

*RT–PCR*Reverse Transcriptase Polymerase Chain Reaction
१) यामध्ये ठराविक रसायनांद्वारे विषाणूच्या थोड्या RNA पासूनही हजार पटीने DNA तयार केले जातात जे तपासणीसाठी योग्य मात्रेत उपलब्ध होतात ( जरी स्वॅबमध्ये कमी प्रमाणात विषाणू असतील तरीही ).
२) यामुळे कोविड निदानासाठी ही सर्वात खात्रीशीर व अचूक तपासणी आहे.
३) पण ही तपासणी बरीच वेळखाऊ आहे. याचा रिपोर्ट यायला २४ ते ४८ तास इतका वेळ लागू शकतो.
४) यासाठी नाकातून व घशातून swab घेतला जातो. किंवा थुंकीही तपासायला घेतली जावू शकते.
५) या तपासणीसाठी योग्य प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागते.जी इतर दोन तपासण्या करिता इतकी गरजेची नसते.
६) कोरोना विषाणू हा प्रामुख्याने पहिल्या आठवड्यात घश्यामध्ये वाढत असतो त्यानंतर तो फुफ्फुसांत वाढायला सुरु होतो. याचाच अर्थ घशातील स्वॅब हा जंतूसंसर्ग झाल्यानंतर एक आठवडा एवढ्याच कालावधी साठी पॉझिटिव्ह येतो. नंतर Throat swab हा False Negative येण्याची शक्यता दाट असते. त्यासाठी जंतूसंसर्गाच्या दुसऱ्या आठवड्यात श्वासनलिकेतील स्वॅब अथवा कफयुक्त थुंकी तपासणे गरजेचे असते.
बरेच असे video बघण्यात आले की आपण RT–PCR चा रिपोर्ट ज्यावेळी मागून घेतो त्यावेळी त्यातील CT value ( Cyclic Threshold ) ही विचारुन घ्या. ती जर २४ पेक्षा जादा असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा कमी असतो म्हणजेच त्या व्यक्तीद्वारे इतरांना संक्रमण ही कमी प्रमाणात होते व जर CT value ही २४ पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा जादा असतो म्हणजेच हे लोक इतरांमध्ये जादा संक्रमण पसरवतात.
हे जरी खरे असले तरी बऱ्याचदा असे पाहायला मिळते की अनेकदा viral load जादा असूनही त्यांच्यामध्ये लक्षणे ही अल्प किंवा मध्यम स्वरुपात बघायला मिळतात. जसे की लहान मुले ज्यांच्यामध्ये क्वचितच लक्षणे तीव्र स्वरुपाची असतात पण त्यांच्याद्वारे जंतूसंसर्ग मोठ्या प्रमाणात पसरवला जातो.
याउलट वयस्कर लोकांमध्ये viral load कमी असूनही तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसतात.
हा खरं तर विरोधाभास आहे.
व त्याचे कारण हे आहे की कोविड मध्ये होणारी complications ही केवळ शरीरात जाणाऱ्या विषाणू मुळे होत नसतात. तर ती प्रामुख्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीने ( Immune system ने ) त्या virus ला किती व कशा प्रकारे प्रतिसाद दिला व त्यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या Inflammatory changes मुळे होत असतात. Immune system च्या प्रतिक्रिया व त्यामुळे होणाऱ्या Inflammatory changes या प्रत्येक पेशंट नुसार वेगवेगळ्या असतात. व त्यामुळे कोणाकोणामध्ये काहीच लक्षणे दिसत नाहीत तर कोणामध्ये खूपच Complications निर्माण होवू शकतात.
CT value ही प्रामुख्याने viral load किती आहे ते सांगते. कोविड किती घातक ठरु शकतो हे नाही. त्यामुळे ICMR ने RT–PCR च्या रिपोर्ट मध्ये CT value देण्यास परवानगी दिलेली नाही.

 *TrueNAT test*
१) हे मशिन गोव्यातील Malbio Diagnostic या कंपनीद्वारे बनवले आहे.
२) हे मशिन पूर्वी TB ची टेस्ट करण्यासाठी वापरले जात होते. अलिकडेच ICMR ने COVID 19 टेस्ट करण्यासाठी या मशिनला परवानगी दिली आहे.
३) हे मशिन छोट्या आकाराचे असून ब्रिफकेस मधून कोठेही घेवून जाता येवू शकते.
४) हे मशिन बॅटरीवर चालते एकदा बॅटरी चार्ज केली की १० तासांपर्यंत चालू शकते.
५) या मशिन मध्ये एका वेळी एकच टेस्ट करता येते. मशिन जर ४ स्लॉटचे असेल तर जास्तीत जास्त ४ टेस्ट एका वेळी करता येवू शकतात. ८ तासाच्या शिफ्टमध्ये जास्तीत जास्त ४५ टेस्ट होवू शकतात.
६) दुर्गम भागात जिथे मोठ्या लॅबची संख्या कमी आहे व जेथून स्वॅब घेवून RT–PCR साठी मोठ्या लॅबमध्ये पाठवणे हेदेखील मुश्किल असते अशा ठिकाणी प्रामुख्याने हे मशिन वापरले जाते.
७) या तपासणी मध्येही RT–PCR प्रमाणे विषाणूचा Genome हा Amplify केला जातो. त्यामुळे यामध्येही स्वॅबमधील विषाणूंचे प्रमाण कमी असले तरी टेस्ट रिपोर्ट अचूक येतो.
८) या तपासणीत मुख्यत: कोरोना विषाणूचा E Gene व विषाणूच्या RNA मध्ये असणारे RdRp हे Enzyme शोधले जाते.
९) ही तपासणी RT–PCR पेक्षा बऱ्याच जलद होते ( अर्धा ते एक तासात ) तसेच या तपासणीसाठी लागणारा खर्चही कमी असतो. (१२०० ते १३०० रुपये) तसेच ही  तपासणी करायला सोपी आहे व त्यासाठी खास प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागत नाही.
१०) असे असले तरी या मशिनची किंमत जादा असल्याने (६.५ ते १२ लाख ) व पुरवठा कमी असल्याने हे मशिन अजून सगळीकडे उपलब्ध नाही आहे.

*Antibody Test*
१) शरीरात एखादा Antigen ( बाहेरचा कोणताही सजीव घटक जसे bacteria, virus इत्यादी ) गेल्यावर त्यांच्याशी लढण्यासाठी जे घटक शरीरामार्फत तयार केले जातात त्यांना Antibody म्हणतात.
२) Antibody Test ही मुख्यतः पूर्वी होऊन गेलेल्या आजाराची माहिती सांगते.
३) Infection झाल्यानंतर शरीरात Antibodies तयार व्हायला साधारण १ ते २ आठवडे इतका कालावधी लागतो. त्यामुळे कोविड निदानासाठी या तपासणीचा कोणताही उपयोग होत नाही.
४) सर्वच लोकांना कोविडमध्ये लक्षणे निर्माण होतील असे नाही. अशावेळी किती लोकांना हा आजार होवून गेला हे लक्षात येण्यासाठी व त्यावरुन या आजाराचा मृत्यूदर निश्चित करण्यासाठी प्रामुख्याने या तपासणीचा उपयोग होतो.

*HRCT*
१) ही चाचणी म्हणजे छातीचा CT scan असतो. 
२) ही चाचणी कोविड निदानासाठी शासनातर्फे जरी ग्राह्य धरली जात नाही.
३) तरीही लक्षणे सुरु होवून ४ ते ५ दिवसांनंतर रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास  रोगनिदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता  समजण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो.
४) RT–PCR च्या तुलनेत याचा रिपोर्ट लगेच मिळत असल्याने तसेच न्युमोनियाची तीव्रता लक्षात येत असल्याने याचा कोविड उपचारासाठी चांगला उपयोग होतो.
५) RT–PCR प्रमाणे याचा रिपोर्ट ही अधिक खात्रीशीर व अचूक असतो. तसेच यावरुन पेशंटच्या शरीरात सुधारणा होवू शकते की पेशंटची स्थिती आणखी बिघडू शकते याचेही याचेही अचूक निदान करता येते.
६) लक्षणे दिसायला लागल्यानंतर पहिल्या ४ दिवसांत HRCT हा इतकी sensitive नसते त्यामुळे ५०% कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये HRCT चा रिपोर्ट नॉर्मल येण्याची शक्यता असते. पण त्यानंतर HRCT ही Highly sensitive म्हणजेच एकदम अचूक असते. 
७) HRCT च्या रिपोर्टमध्ये खालीलप्रमाणे लक्षणे दिसू शकतात
a.) सुरवातीला ( कोविड लक्षणे सुरु झाल्यानंतर ७ दिवसांमध्ये ) — Ground Glass Opacity (GGO)
b.) ७ दिवसानंतर न्युमोनिया वाढल्यास —1. GGO वाढणे2. Crazy paving pattern3. Consolidation4. Fibrosis
८) *HRCT Score*
a.) न्युमोनिया हा फुफ्फुसांमध्ये किती प्रमाणात वाढला आहे हे समजण्यासाठी HRCT मध्ये Score दिला जातो.
b.) हा स्कोर 0 ते 25 या दरम्यान असतो. 0 स्कोर याचा अर्थ फुफ्फुसांत न्यूमोनिया अजिबात पसरलेला नाही असा होतो तर 25 स्कोर म्हणजे न्यूमोनिया फुफ्फुसांत सर्वत्र पसरलेला आहे असा अर्थ होतो. 
c.) 25 पैकी स्कोर असताना 
1) कमी प्रमाणातील न्यूमोनिया — 12 पेक्षा कमी स्कोर असणे.
2) मध्यम न्यूमोनिया — 12 ते 18 स्कोर असणे.
3) तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया — 18 पेक्षा जास्त स्कोर असणे.
d.) फुफ्फुसे किती टक्के बाधित झाली आहेत हे कळण्यासाठी HRCT Score ला ४ ने गुणले जाते. पण ते दरवेळी बरोबर येईलच असे सांगता येत नाही.
e.) बऱ्याच रिपोर्ट मध्ये HRCT Score हा ४० पैकी दिला जातो त्यावेळी वरील दोन्ही नियम लागू पडत नाहीत.
९) पेशंटची न्यूमोनिया आणखी वाढू शकतो की कमी होवू शकतो हे कळण्यासाठी HRCT सोबतच C Reactive Protein, serum ferritin, lymphocytes या तपासण्या करणेही गरजेचे असते.
१०) X रे मध्ये कोविड ची सुरवातीची GGO सारखी लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे X रे चा कोविड निदानासाठी हवा तितका उपयोग होत नाही.
*कोविड टाईम लाईन*
कोविड मध्ये कोणत्या दिवशी साधारण कोणत्या गोष्टी होतात हे आता पाहू.
दिवस ० — जंतूसंसर्ग
दिवस ५ — लक्षणे दिसण्यास सुरुवात
दिवस १ ते २८ — RNA व Antigen पॉझिटिव्ह
दिवस २८ — RNA व Antigen निगेटिव्ह
दिवस ० ते ७ — फक्त RT–PCR टेस्ट पॉझिटिव्ह
दिवस ९ — HRCT मध्ये लक्षणे दिसतात
दिवस ७ — IgM Antibody पॉझिटिव्ह
दिवस १४ — IgG Antibody पॉझिटिव्ह
दिवस २१ — IgM Antibody निगेटिव्ह
दिवस १४ ते २१ — रोगाचा लक्षणे कमी होण्याचा टप्पा पण तरीही इतरांना जंतूसंसर्ग करु शकतो.
दिवस २१ ते २८ — RT–PCRकधी कधी पॉझिटिव्ह येवू शकते पण इतरांना जंतूसंसर्ग होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *