समाजाच्या मौलिक समस्या सोडवित पुढे जा

समाजाच्या मौलिक समस्या सोडवित पुढे जा
आपण थोडेफार शिक्षण घेऊन वा उच्च शिक्षण घेऊन फक्त नेते वा विद्वान तयार केलेत ,आपली वैचारिक लोकसंख्या कमी मात्र नेते भरपूर आणि काहीही मौलिक समस्या न सोडविता, लोकांना अतिधार्मिक वा अंधश्रद्धा निर्माण करणारी केवळ भावनिक भाषणे देऊन वा लोकाकडून पैसे जमा करून शहरात कार्यक्रम आयोजित करून व स्वतःच मुख्य अतिथी बनून भाषणे देऊन आपल्याला खूप ज्ञान आहे असे भासवून समाजात दररोज एक नेता वा विद्वान तयार होतोय परंतु ह्या नेत्यांनी वा विद्वानानी कधी समाजाच्या मौलिक समस्या सोडविल्या नाहीत मात्र हे नेते आपला स्वार्थ, आपली लेकरं वा आपली खुर्ची ह्यापलीकडे गेली नाहीत.उच्च प्रगत शिक्षण कसे देता येईल व शैक्षणिक वा फ्रीशिप वा शिष्यवृत्तीत येणाऱ्या समस्या कशा सोडविता येतील व सहयोगातुन काही उभारले जाऊ शकते ह्यावर विचार मंथन होताना दिसत नाही वा भविष्यातील पिढीचे मेरिट वा भविष्य संवर्धनासाठी पाहिजे तसा प्रयत्न केल्या जात नाही.जेवढ्या राजकीय संघटना वा सामाजिक संघटना तेवढेच नेते वा विद्वान वा तेवढे कार्यकर्ते स्वतः मिरवून घेण्यासाठी वेगवेगळ्या संघटना स्थापन करून पद धारण करून तयार झालेत व इतरांची चाकरी पोट भरण्यासाठी करू लागलीत मात्र समाजाच्या वर्तमान मौलिक समस्या सोडवित नेते वा विद्वान निर्माण झाले असते तर आज आपण आर्थिकच नव्हे तर सर्व दृष्टीने सक्षम असतो.आज एक टक्का ही समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही,कालच्या आणि आजच्या समस्या आहे तशाच वेगळ्या स्वरूपात उभ्या आहेत,आजही ऍट्रोसिटीचे बळी आपला समाज ठरतोय,केवळ राजकारण वा शब्दाच्या कातक्युट्या करीत राहिलो वा मंदिर मुक्तीचे मुद्दे पुढे रेटत राहिलो तर आजची पीढि नक्कीच बरबाद होईल हे वास्तव आपण मान्य करा वा नका करु परंतु जो समाज आर्थिक स्रोत निर्माण करीत नाही वा आर्थिक सक्षम होईल असे उच्च शिक्षण घेत नाही वा युवा पीडीच्या वर्तमान समस्या सोडवित नाही तो समाज भविष्यात गुलामीच्या दिशेने वाटचाल करेल एवढे मात्र खरे.दररोज नवनवीन सामाजिक वा राजकीय संघटना स्थापन करून आपण काय साद्य करतोय? आपण खुप काही आहोत म्हणून नवीन सामाजिक वा राजकीय संघटना स्थापना करतोय वा काही नसताना आपले मोठेपणा सिद्ध करण्यासाठी वा बॅनर बनवून पद धारण करून आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी हे फार मोठे कोढे आहे! संघटना स्थापण करून नेत्याची फौज तयार करताना समाजाच्या मौलिक समस्या सोडवित पुढे जावे अन्यथा नेते वा विद्वानाच्या प्रमाणात समस्या दहापट वाढतील ह्यावर उपाय शोधून पुढे जावे ही नम्र सुचनावजा विनंती.
ॲड.डॉ.सत्यपाल कातकर,मनोवैज्ञानिक,राजुरा,चंद्रपूर 9822722765