सरस्वती विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
Summary
अर्जुनी मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी.एम. बी.विद्यालय व सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती […]

अर्जुनी मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी.एम. बी.विद्यालय व सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महेश पालीवाल,पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे,जी.एम.बी. प्राचार्या शव्या जैन, समन्वयक भगीरथ गांधी, कल्पना भुते, प्रा.टोपेश बिसेन,प्रा.नंदा लाडसे प्रा.ईंद्रनील काशीवार व शशिकांत लोणारे यांची होती. सर्वप्रथम मराठी भाषेतील जेष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरंच अतुलनीय असून आपण आणि भविष्यातील पिढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा असे प्रतिपादन प्राचार्य जे.डी.पठान यांनी केले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेबद्दल आपले विचार व्यक्त केले. तसेच मराठी विषयशिक्षक इंद्रनील काशीवार,शशिकांत लोणारे यांनी मराठी भाषेबद्दल आपले विचार व्यक्त केले. तर दीपक जीभकाटे व दीपेश्वरी मेंढे यांनी स्वरचित कवितेचे गायन केले. छकुली नाकाडे व प्रिन्स डोंगरे या वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेबद्दल आपले विचार व्यक्त केले. तर वर्ग पाचवीच्या विद्यार्थिनींनी गीत गायन केलं. कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठीची अस्मिता जोपासणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मराठी विषय समितीतर्फे ग्रंथदिंडी, मराठी गद्य व पद्य,साहित्य यांचे प्रदर्शन व मराठी संस्कृतीचा परिचय इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन करून आभार अर्चना गुरनुले यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व मराठी अध्यापन करणारे शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.