BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून ‘बाटू’ विद्यापीठाचा आढावा

Summary

मुंबई, दि.26 : राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी 25 फेब्रुवारी रोजी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कामकाजाचा राजभवन मुंबई येथे आढावा घेतला.  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी यावेळी विद्यापीठासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी राष्ट्रीय […]

मुंबई, दि.26 : राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी 25 फेब्रुवारी रोजी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कामकाजाचा राजभवन मुंबई येथे आढावा घेतला.  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी यावेळी विद्यापीठासंदर्भात सादरीकरण केले.

यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठातील पायाभूत सुविधांचा विकास, परदेशी भाषा शिक्षणास प्रोत्साहन, परदेशी विद्यापीठांशी सहकार्य, विविध प्रवर्गांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी, वसतिगृह सुविधा, शाळांशी सहकार्य,  कौशल्य विकास, क्रीडा सुविधांचा विकास, ‘स्वच्छ भारत अभियान’ व ‘विकसित भारत’ उपक्रमांमध्ये विद्यापीठाचा सहभाग आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.

बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए. डब्ल्यु. किवळेकर, अधिष्ठाता शैक्षणिक विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. एस. एल. नलबलवार, अधिष्ठाता संशोधन व विकास डॉ. एस. एम. पोरे, विशेष कार्य अधिकारी, संलग्निकरण डॉ. एच. एस. जोशी, परिक्षा नियंत्रक डॉ. एन. एस. जाधव यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *