नागपूर ग्रामीण क्राईम ब्रांच जोमात उत्पादन शुल्क विभाग कोमात मरकसुर चे शेत शिवारात बनावट देशी दारू कारखान्यावर क्राईम ब्रांचचा (पोलीसांचा) छापा बनावट दारू व बॉक्स सह 11,82,520 रूपयांचा मुद्दे माल जप्त दोन आरोपी गजाआड, तीन आरोपीचे शोधसत्र सुरू

कोंढाळी –
कोंढाळी पोलीस स्टेशन चे हद्दीतील जंगल प्रवण क्षेत्रातील मौजा मरगसूर येथील शेत -शिवारात अवैध रित्या, विनापरवाना बनावट दारू कारखान्यावर 19फेब्रूवारी चे सकाळी पोलीसांनी छापा (धाड)टाकत दोन नग बॉटल कॅप सिलिंग मशीन,हन्ड मेड लोखंडी आकाशी पेंट असलेल्या AMIRI कंपनी च्या प्रतेकी किमती75000/-प्रमाणे 150,000/-,16नग खर्डा बॉक्स ज्या मधे एकुण1600नग 90एम एल,च्या प्लास्टिक शिशांमधे बनावट दारू भरून असलेले प्रत्येकी दर बॉक्स किंमत 3500/-याप्रमाणे एकुण किंमत 56000/-, निळ्या रंगाची दोनशे लिटर चे प्लास्टिक ड्रम ज्या मधे 200लिटर /300/-लिटर किंमती स्पिरीट एकुण किंमत 6000/-,06नग मोठे खरडे बॉक्स ज्या मधे 750-नग रिकाम्या 90एम एल च्या प्लास्टिक बॉटल याप्रमाणे 4500नग कि़ंमत एकुण 22500/-,दोन प्लास्टो कंपनी चे 1000लिटर क्षमतेचे आरोफिल्टर बॉटल स्पिरिर लिक्वीड आर्टिफिशियल फ्लेवरिंग असे एकुण 2000 लिटर द्रव्य भरून असलेले प्रति लिटर 330रूपये प्रमाणे 6,60,000/-, विद्युत पंप (टिल्लू )किंमत 2500/-,15 नगप्लास्टिक कैरट -4500/-,12चौकोनी खर्डे बॉक्स प्रत्येक बॉक्स मधे 10,000नग,1,20,000नग, पिवळ्या झाकण ज्यावर राॉकेट देशी दारू प्रिंट असलेले,1,20,000,
180खर्डे ज्यावर रॉकेट देशी दारू प्रवरा नगर अहमदनगर नगर, 3000/-,30 नग रॉकेट देशी दारू, प्रवरानगर महाराष्ट्र बैच नं 335,लेबल बंडल प्रत्येकी15000एकुन 4500/-, 500एम,एल.काचेच्या बाटल्या मधे इंटरनैशनल फ्लेवर, किंमत 9120,रिकामे ड्रम 10किंमत 7000/-टेप बंडल – 72नग 10800/-, तसेच अल्कोहोल मोजण्याची मशीन, इन्व्हर्टर, बैटरी चार्जर,आरो वाटर जार, प्लास्टिक डबक्या, मोटरसायकल क्रं एम एच 31-बी जी-0097,असे एकूण 11,82,520/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करून कलम 123,318,(4),338,340(2),3(5), भा.न्या.स. सह कलम 65अ,ब,क,ड,फ, 67(1),(अ),67(1), क, 72,83,86,90,मादाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी-1)मिथुन महादेव शहा -चणापूर,2)पंकज कुमार बेचैन सिंह -रा भानेगाव, या दोघांना अटक करून पुढील तपास कामी कोंढाळी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. तर1) विशाल शंभू मंडल, राजेंद्र यादव दोन्ही चनकापूर व सागर सिंग रा तळेगाव फरार आरोपींचे शोधसत्र सुरू आहे .
ही कारवाई नागपूर जिल्हा ग्रामीण चे गुन्हे शाखेचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, यांचे मार्गदर्शनात स.पो. नि. किशोर शेरकी,स पो.नि. जीवन राजगुरू, स. पो नि. आशिष सिंह ठाकुर, पो हवालदार -प्रमोद तभाने, संजय बांते, इक्बाल शेख, राहूल पाटील, तसेच सुमित बांगडे यांनी पार पाडली. या कारवाई दरम्यान कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व स्टाफ यांचे ही सहकार्य लाभले.