महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कर्जत, जामखेड तालुक्यातील जलसंधारण कामांना गती द्यावी-सभापती प्रा. राम शिंदे

Summary

मुंबई, दि. १७ :अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यात सुरू असणारी जलसंधारणाची कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. विधानभवनात अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यातील जलसंधारणाच्या मंजूर व पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. […]

मुंबई, दि. १७ :अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यात सुरू असणारी जलसंधारणाची कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

विधानभवनात अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यातील जलसंधारणाच्या मंजूर व पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मृद व जलसंधारण विभाग नाशिकचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, पुण्याचे मुख्य अभियंता एस.पी.कुशिरे, जामखेडचे उप विभागीय जलसंधारण अधिकारी पी. एन. शिंदे, पारनेरचे जलसंधारण अधिकारी वाय. ए. अबिलवादे उपस्थित होते.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, जामखेड तालुक्यातील जवळा-बारव येथील साठवण तलाव योजनेची निविदा प्रक्रिया २८ फेब्रुवारी अखेर पूर्ण करावी. यावेळी कर्जत तालुक्यातील  कामांचा तसेच १५१ कामांपैकी पूर्ण ६० आणि अन्य प्रगतीपथावरील ४५ कामांबाबत आणि जलसंधारण मंडळ, जलयुक्त  शिवार अभियान 2.0, अटल भूजल योजना, जलसंवर्धन योजना, गाळमुक्त शिवार योजना आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *