दिघोरी (मोठी) पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार हितेश मडावी यांना निलंबित करण्याची मागणी भंडारा पोलीस अधीक्षक यांना दिली तक्रार दिघोरी पोलीसांच्या कर्तव्यावर प्रश्न चिन्ह रक्षकच झाले भक्षक

भंडारा :- लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुना खोलमारा येथील सौ पुनम प्रकाश नागरीकर हिला त्याच गावातील सुभाष नागरीकर या ईसमानी भर चौकात फरफटत नेउन साडी सोडून छातीवर बसुन नको त्या ठिकाणी स्पर्श करुन मारहाण केली
फिर्यादीने याची तक्रार दि. १५ जानेवारी ला दिघोरी पोलीस स्टेशनला जावुन दिली मात्र येथील पोलीसांचे आरोपीच्या बायकोचे भाऊ (साळे)रेती तस्कर रोषन लोथे मु. बोथली धर्मापुरी यांचे सोबत संघनमत करुन दिघोरी पोलीस स्टेशनचे हवालदार हितेश मडावी, पी एस. आय बुरांडे, यांनी घटनेच्या दोन दिवसा नंतर दि. १७ जानेवारी ला बारव्हा बाजार पेठ गुजरी मधुन मच्छी घेऊन बाहेर पार्टी केली या मध्ये लाखो रुपयांची आर्थीक देवाणघेवाण करून दखल पात्र गुन्हा असून प्रकरण दडपण्याचा उद्देशाने अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. पीडितेला न्याय न मिळाल्याने पीडीत महिलेने दि. २१ जानेवारीला भंडारा पोलीस अधीक्षक यांना तक्रार दिल्या नंतर तब्बल नऊ दिवसाने दि. ३० जानेवारी रोजी पोलीस स्टेशन दिघोरी येथे (१) भारतीय न्याय सहीता (बी एन एस)२०२३ कलम ७९ (२)भारतीय न्याय सहीता (बी एन एस) २०२३ कलम २९६ (३)भारतीय न्याय सहीता (बी एन एस) २०२३ कलम ११५(२) नुसार आरोपीच्या विरोधात विविध कलमा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या वरुन असे सिद्ध होते की दिघोरी पोलीसांनी आरोपीच्या साळ्या कडुन आर्थिक देवाणघेवाण करुन प्रकण दडपला होता मात्र पीडित महिने वरिष्ठांकडे तक्रार केल्या नंतर गुन्हे दाखल करण्यात आले. त्या मुळे पोलीस हवालदार हितेश मडावी हे गेल्या ७ते ८ वर्षापासून बारव्हा बिटाचे कामे करतात मात्र यांचे अवैध धंदे दारू, सट्टा, रेती, कोंबडा बाजार,जुगार ,वाल्यांन सोबत हितसंबंध प्रस्तावित असल्याची परीसरात चर्चा केली जात आहे.यांना निलंबित करण्याची मागणी पिडीत महिलेने केली आहे. पिडीतेला न्याय मिळणार काय या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.