चिखली येथे चक्रवर्ती राजाभोज जयंती मोठया उत्साहात संपन्न
कोंढाळी : प्रतिनिधी
नजीकच्या चिखली , ता. काटोल , जि. नागपूर येथे युवा भोयर पवार मंच , शाखा – चिखली द्वारे २ फेब्रुवारी ‘ वसंत पंचमीच्या ‘ दिवशी भोयर , पवार समाजाचे आराध्य चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
सर्व प्रथम संपूर्ण गावात शोभायात्रेचे भ्रमण झाल्यानंतर निमंत्रित अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून चक्रवर्ती राजाभोज व सरस्वती मातेच्या प्रतिमांचे पूजन करुन भोयरी भाषेत आरती करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत स्वागतगीताने कु. सायली रविंद्र किनकर द्वारा करण्यात आले . मुख्य कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रावण फरकाडे ( अध्यक्ष , युवा भोयर पवार मंच , नागपूर ) , कार्यक्रमाचे उद्घाटन मा.सौ सरीताताई गाखरे ( सचिव , भारतीय जनता पक्ष , महाराष्ट्र प्रदेश ) प्रमुख अतिथी मा. इंजि. सुरेश देशमुख ( महासचिव , राष्ट्रीय राजाभोज स्मारक समिती , भारत ) मा. मनोज गोरे ( अध्यक्ष, युवा भोयर पवार मंच , कोंढाळी ) विशेष अतिथी वैभव मुन्ने ( अध्यक्ष, युवा भोयर पवार मंच , शाखा – चंदनपारडी , सौ संगीताताई किनकर, ( अध्यक्ष , महिला मंडळ , यु.भो.प.मंच , कोंढाळी ) राजू धोटे ( संयोजक , यु.भो.प.मंच , शाखा – चिखली ) यु.भो.प.मंच, कोंढाळीचे पदाधिकारी निलेश फरकाडे ( सचिव ), चंदू डोंगरे ( उपाध्यक्ष ) , रविंद्र किनकर ( कोषाध्यक्ष ) , सतीश चोपडे ( सह कोषाध्यक्ष ), प्रकाश बारंगे ( उपाध्यक्ष ) , गोलू बोवाडे ( सहसचिव ) , कमलेश चोपडे ( संघटन सचिव ) , सुशिल कसारे ( संयोजक, शाखा – चंदनपारडी ) , वैभव कडवे ( अध्यक्ष, शाखा – चिखली ) प्रशांत धारपुरे ( उपाध्यक्ष, शाखा – चिखली ) सचिन चोपडे ( उपाध्यक्ष, शाखा – चिखली ) सौ. अंकीता डोबले ( अध्यक्ष, महिला मंडळ , चिखली ) सौ. ललिता पेंधे ( उपाध्यक्ष , चिखली ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सौ. सरीताताई गाखरे यांनी आपल्या उद्बोधनात भोयर, पवार समाजाचे वैभव चक्रवर्ती राजाभोज यांचा वैभवशाली अद्वितीय कार्यकाळ , त्यांची साहित्य संपदा , अलौकिक ज्ञान इत्यादी वर मार्गदर्शन केले. इंजि. सुरेश देशमुख यांनी भोयर समाजाची बोलीभाषा भोयरी बोली , संस्कृती – परंपरा व ऐतिहासिक वारसा यांचे महत्त्व पटवून दिले . भोयरी बोली – भाषेचे संवर्धन व जतन करणे अत्यावश्यक आहे या करीता मायबोली भोयरी साहित्य मंच , नागपूर प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले . श्रावणजी फरकाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात युवा भोयर पवार मंचच्या १७ वर्षाच्या प्रवासाच्या कार्यावर मार्गदर्शन केले व शैक्षणिक क्षेत्रातील शासकीय योजनांची माहिती दिली . समाज बांधवांनी एकजुटीने राहून आपल्या समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कु. लावण्या राजु धोटे हिने भोयरी बोलीत ” म्हरो गाव ” ही कविता सादर केली . कार्यक्रमाची प्रस्तावना चिखली शाखेचे अध्यक्ष वैभव कडवे यांनी मांडली . कार्यक्रमाचे संचालन सतिश चोपडे यांनी केले व आभार प्रदर्शन राजु धोटे यांनी केले . कार्यक्रमाच्या सफलतार्थ युवा भोयर पवार मंच , शाखा – चिखली चे सर्व पदाधिकारी , सर्व समाज बांधव , महिला मंडळ , संघर्ष युवा प्रतिष्ठान चे सर्व सदस्य व बालगोपाल मंडळींचे सहकार्य लाभले.