डॉ.बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी ‘जिल्हा नियोजन’ मधून निधी देण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश
Summary
मुंबर्ई, दि. 7 : रत्नागिरी जिल्ह्यातील जाकिमिऱ्या येथील माजी मंत्री डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकाच्या प्रलंबित कामांसाठी जिल्हा विकास नियोजनमधून 93 लाख रुपयांचा निधी देण्याचे व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी दिले. माजी मंत्री डॉ.सावंत यांचे जाकिमिऱ्या येथे स्मारक […]
मुंबर्ई, दि. 7 : रत्नागिरी जिल्ह्यातील जाकिमिऱ्या येथील माजी मंत्री डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकाच्या प्रलंबित कामांसाठी जिल्हा विकास नियोजनमधून 93 लाख रुपयांचा निधी देण्याचे व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी दिले.
माजी मंत्री डॉ.सावंत यांचे जाकिमिऱ्या येथे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाच्या ऊर्वरित कामासंदर्भात श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
डॉ. सावंत स्मारकाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून दरवाजे, खिडक्या, रंगकाम, स्वच्छतागृहाचे काम व विद्युतीकरणाचे काम प्रलंबित आहे. स्मारकाच्या कामासाठी 13 एप्रिल 2018 रोजी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतरही कामे प्रलंबित असल्यामुळे तसेच स्मृतीशिल्प, बगीचा, संरक्षक भिंत, फुटपाथ, पाणीपुरवठा, वाहनतळ, विद्युतीकरण ही कामे तातडीने करण्यासाठी 93 लाख रुपयांच्या निधीची मागणी ‘जिल्हा नियोजन’ मधून देण्यास जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत. डॉ. सावंत स्मारकाचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश श्री.चव्हाण यांनी यावेळी दिले.