सरस्वती विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Summary
अर्जुनी मोर :- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,जी.एम.बी. इंग्लिश मीडियम हायस्कूल, सरस्वती ज्ञानदीप प्री प्रायमरी कॉन्व्हेंट व सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी केशरबाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भावेश भुतडा […]

अर्जुनी मोर :- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,जी.एम.बी. इंग्लिश मीडियम हायस्कूल, सरस्वती ज्ञानदीप प्री प्रायमरी कॉन्व्हेंट व सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी केशरबाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भावेश भुतडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी शाळेचे प्राचार्य जे.डी. पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे, सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना भूते, जी.एम.बी.ईंग्लीश मिडीयम हायस्कूलच्या प्राचार्या शव्या जैन, समन्वयक भगीरथ गांधी, संस्थेचे पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, माजी शिक्षक उपस्थित होते. शाळेतर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन व आभार ज्योत्स्ना शेळके यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.