BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

भायखळा येथे २७ जानेवारी रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’

Summary

मुंबई, दि. 24 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई यांच्यावतीने एम.एच साबू सिद्दीक अभियांत्रिकी महाविद्यालय, 8, साबू सिद्दीक पॉलिटेक्निक मार्ग, भायखळा येथे दि. 27 जानेवारी 2025 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये नामांकित औद्योगिक आस्थापना व उद्योजक […]

मुंबई, दि. 24 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई यांच्यावतीने एम.एच साबू सिद्दीक अभियांत्रिकी महाविद्यालय, 8, साबू सिद्दीक पॉलिटेक्निक मार्ग, भायखळा येथे दि. 27 जानेवारी 2025 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये नामांकित औद्योगिक आस्थापना व उद्योजक सहभागी होणार आहेत. तसेच राज्यातील सर्व नोंदणीकृत उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे आणि रोजगार मेळाव्याच्या दिवशी बायोडाटा आणि इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीकरिता उपस्थित रहावे.

नोंदणी नसलेल्या उमेदवारांनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणी करण्यास काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,  मुंबई शहर, श्रेयस चेंबर्स, पहिला मजला, 175, डॉ. डी.एन. मार्ग, फोर्ट मुंबई येथे संपर्क साधावा. तरी राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई यांनी केले आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *