जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी सरस्वती विद्यालयाचे घवघवीत यश

अर्जुनी मोरगाव: दिनांक 10 व 11 जानेवारी 2025 रोजी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन गोंदिया येथील सरस्वती महिला विद्यालय येथे करण्यात आले.सदर विज्ञान प्रदर्शनी प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यातील शाळांनी सदर प्रदर्शनीत सहभाग नोंदविला. यात सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी/मोरगाव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. त्यात प्राथमिक गटात गार्गी सुरेश कुंभार हिने ऑटोमॅटिक रेस्क्यू ब्रिज या प्रयोगासह सहभाग घेतला त्यात तिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. दिव्यांग गटातून मुकुंद लालकृष्ण करंजेकर या विद्यार्थ्यांने फ्युचरिस्टिक इको फ्रेंडली रोड या प्रयोगासह सहभाग घेतला त्यात त्याने प्रथम क्रमांक पटकाविला.तर माध्यमिक गटातून तन्मय सिद्धार्थ जांभूळकर याने इको फ्रेंडली अँड सेफ्टी ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट या प्रयोगासह सहभाग घेतला त्यात त्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व यशवंत विद्यार्थी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी पात्र ठरले आहे. तसेच 7 ऑगस्ट 2024 रोजी गोंदिया येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात अस्मिता राजेश हातझाडे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष बल्लभदास भुतडा, कोषाध्यक्ष जयप्रकाश भैया, संस्थासचिव सर्वेश भुतडा, प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे,सर्व प्राध्यापक व शिक्षक वृंद यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक अमर वसाके, किरण पर्वते, सुभाष धोटे व सर्व विज्ञान शिक्षक यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.