BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा जिल्हा पोलीसांकडुन दि. ०६-०१-२०२५ दरम्यान पोलीस प्रदर्शनाचे आयोजन

Summary

पोलीस रेझींग डे सप्ताह च्या अनुषंगाने भंडारा जिल्हा पोलीसांकडुन जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन येथे विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, भंडारा जिल्हा पोलीस दला तर्फे दिनांक ०६/०१/२०२५ ०८/०१/२०२५ असे ०३ दिवस पोलीस परेड ग्राउंड, पोलीस मुख्यालय भंडारा येथे सकाळी […]

पोलीस रेझींग डे सप्ताह च्या अनुषंगाने भंडारा जिल्हा पोलीसांकडुन जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन येथे विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, भंडारा जिल्हा पोलीस दला तर्फे दिनांक ०६/०१/२०२५ ०८/०१/२०२५ असे ०३ दिवस पोलीस परेड ग्राउंड, पोलीस मुख्यालय भंडारा येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.०० वा. दरम्यान निःशुल्क पोलीस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनी मध्ये पोलीस विभागातील विवीध शाखेचे स्टॉल व्दारे पोलीस कार्यप्रणाली बाबत नागरीकांना माहिती देण्या येणार आहे. त्यामध्ये सायबर विभाग, वाहतुक विभाग, आर्थिक गुन्हे शाखा, महीला सुरक्षा शाखा, शस्त्र प्रदर्शनी, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, डायल ११२, मोटार परीवहन विभाग, फॉरेन्सिक व्हॅन, सीसीटएनएस, बँड पथक, मॉडेल पोलीस स्टेशन अशा प्रकारचे दालने राहणार असुन त्याव्दारे पोलीसांची कार्यप्रणाली व नागरीकांची सुरक्षितता याबाबत माहिती व प्रात्याधीक दाखविण्यात येणार आहेत.

सदर प्रदर्शनी दरम्यान विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. असुन त्यामध्ये भंडारा पोलीस सायबर बॉट या नविन ऑनलाईन सायबर फॉड मार्गदर्शन प्रणालीचे उद्घाटन मुद्देमाल व हरविलेले मोबाईल वाटप, पोलीस पाटील प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरीकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातील सहकुटुंब सहपरीवार भेट देवुन पोलीसांचे कार्यप्रणालीबाबत जाणुन घेणेबाबतचे आवाहन पोलीस अधीक्षक भंडारा नूरुल हसन भा. पा. से. यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *