सरस्वती विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
Summary
अर्जुनी मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे, उषा मेश्राम, दिपाली कोट्टेवार, माधुरी वनवे यांची होती. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले […]

अर्जुनी मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे, उषा मेश्राम, दिपाली कोट्टेवार, माधुरी वनवे यांची होती. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. सावित्रीबाई प्रमाणे विद्यार्थ्यांनीही समाजसेवेचा वसा पुढे चालू ठेवावा असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्य जे.डी.पठाण यांनी केले. याप्रसंगी वर्ग पाच ते नऊच्या विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या महिलांची वेशभूषा करून कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे संचालन करून आभार अर्चना गुरुनुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य केले.