आमदार चरणसिंग ठाकूर यांनी घेतली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट काटोल मध्ये CCI कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी

दिनांक – 31.12.2024
काटोल
आज दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराजजी सिंह यांची काटोल विधानसभेचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी नागपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष सुधाकरजी कोहळे, कृषी उत्पन्न बाजार समिती, काटोलचे संचालक दिनेश ठाकरे यांनी भेट घेऊन कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना योग्य भाव मिळावा व्यापाऱ्यांकडून त्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून CCI चे हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची विनंती केली.
तसेच काटोल विधानसभेमध्ये 500 एकरचे वर औद्योगिक क्षेत्र असून परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याकरिता कापूस उत्पादनावर आधारित टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्याकरिता संबंधितांना निर्देश द्यावेत. तसेच नागपूर जिल्ह्यातील दौऱ्या दरम्यान काटोल येथे भेट देण्याची विनंती करण्यात आली.