चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र. मधील नवनियुक्त मुख्य अभियंता मा.विजय जी राठोड साहेब यांच्या समवेत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती ची सदिच्छा भेट बैठक संपन्न.🤝✊🔥🔥🔥🔥🔥🔥🔥⛳⛳⛳⛳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Summary
चंद्रपूर :- दिनांक २७/१२/२०२४ ———————————– चंद्रपूर ⚡महाऔष्णिक विद्युत केंद्र भारतातील प्रथम क्रमांकाचे विद्युत निर्मिती केंद्र मानले जाणारे वीज निर्मिती केंद्र बिंदू मधील दिनांक २३/१२/२०२४ सोमवार ला नवनियुक्त मुख्य अभियंता म्हणून मा.विजयजी राठोड साहेब यांनी गिरीषजी कुमारवार साहेब यांच्या बदल्यात मुख्य […]

चंद्रपूर :-
दिनांक २७/१२/२०२४
———————————–
चंद्रपूर ⚡महाऔष्णिक विद्युत केंद्र भारतातील प्रथम क्रमांकाचे विद्युत निर्मिती केंद्र मानले जाणारे वीज निर्मिती केंद्र बिंदू मधील दिनांक २३/१२/२०२४ सोमवार ला नवनियुक्त मुख्य अभियंता म्हणून मा.विजयजी राठोड साहेब यांनी गिरीषजी कुमारवार साहेब यांच्या बदल्यात मुख्य अभियंता चा पदभार स्वीकारला.
चंद्रपूर⚡महाऔष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांना आज दिनांक २७/१२/२०२४ ला नवनियुक्त मुख्य अभियंता मा.विजयजी राठोड साहेब यांच्या सोबत चर्चेदरम्यान बैठकीमध्ये सादक – बादक विषयावर चर्चा करण्या करीता संयुक्त कृती समितीला बैठकी करता पाचारण करण्यात आले. बैठकी मध्ये मा.उपमुख्य अभियंता भूषणजी शिंदे साहेब ,उपमुख्य अभियंता श्यामजी राठोड साहेब, मा. बोहाळे साहेब तसेच सहाय्यक कल्याण अधिकारी मा. राणू कोपते मॅडम,महानिर्मिती सुरक्षा विभाग अधिकारी गोंगले साहेब तसेच इतर अनेक पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात मा. मुख्य अभियंता विजयजी राठोड साहेब यांनी कंत्राटी कामगार कृती समिती चे कामगार प्रतिनिधी यांचा सर्वांचा परिचय घेऊन बैठकीला सुरुवात करण्यात आली.
बैठकी दरम्यान खेळी -मेळी च्या वातावरणात अनेक विषयावर चर्चा करण्या आली .त्यामध्ये प्रामुख्याने खालील विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली……………
———————————–
१) कंत्राटी कामगार यांना पोलीस वेरिफिकेशन च्या अडचणीत डावलण्यात येत आहे. कामगारांना पोलीस व्हेरीफॅशनची दोन वर्षाची मुदतवाढ करण्यात यावी. तसेच या आधी या विषयावर कंत्राटी कामगार कृती समिती सोबत चर्चा होऊन हा विषय निकाली लागलेला आहे. परंतु अंमलबजावणी मात्र करण्यात आली नाही.
२) महानिर्मितीच्या राज्यव्यापी आंदोलनामधून कंत्राटी कामगारांना मूळ वेतनात 19% टक्के वाढ करण्यात आली. परंतु अर्धवट कंत्राटदार यांच्या कडून माहे. एप्रिल २०२४ पासून चे नोव्हेंबर २०२४ पर्यंतचे एरियस मिळाले नाही यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यावे. कंत्राटी कामगार यांना आर्थिक जलद लाभ व्हावा.
३) चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र मधिक कंत्राटी कामगारांचे Face Recugnation (Bio-Meric) उर्वरित कंत्राटी कामगारांची ज्यांची नोंद झाली नाही त्यांची नोंद करून घेण्या बाबत.
४) काही कंत्राटदार कामगारांच्या मासिक वेतनातून अर्धी रक्क परत माघतात अश्या कंत्राटदारावर सक्त कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
५) AMC कंत्राट संपल्या नंतर नवीन कंत्राताची प्रक्रिया जलद गतीने न झाल्याने कंत्राटी कामगारांना चार – ते पाच महिने अवकाश ( खंड) पडतो त्यामुळे कंत्राटी कामगारांवर बेरोजगारी व उपासमारी चे परिस्थिती निर्माण होतें करीता या प्रक्रियेत सुधारणा करण्यात यावी.
६) कृती समिती मधील सहभागी असणाऱ्या प्रत्येक संघटनेतील. अध्यक्ष/ सचिव यांना कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्या करीता महानिर्मिती कार्यालय मध्ये दूरध्वनी साधन ( मोबाईल) बाळगण्याची मुभा देण्यात यावी.
७) कृती समिती मधील समावेश असणाऱ्या सर्व संघटनेच्या प्रलंबित प्रकरनांची तात्काळ सोडवणूक करण्या यावी.
वरील विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली चर्चे दरम्यान मा.मुख्य अभियंता विजयजी राठोड साहेब यांनी वरील विषयाचे तात्काळ सोडवणूक करण्यात येईल असे बैठकी मध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती च्या पदाधिकारी यांना आश्र्वाशीत केले.
———————————–
बैठकी मध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती समिती चे पदाधिकारी संयोजक मा.बंडू भाऊ हजारे ,अध्यक्ष मा.भाई सदानंद देवगडे , सचिव मा.संतोष भाऊ नीकुरे, कार्याध्यक्ष मा. हेरमन जोसफ,उपाध्यक्ष मा.प्रमोद भाऊ कोलारकर , उपाध्यक्ष मा. गजानन भाऊ जवादे, प्रसिद्धी प्रमुख मा. संतोष भाऊ पारखी,संघटक मा शंकरजी बागेसर, सहसाचिव मा.संतोष भाऊ ढोक, सल्लागार मा.अरुण भाऊ कांबळे, प्रमोद भाऊ थेरे, विवेकानंद भाऊ मेश्राम, आधी पदाधिकारी उपस्थीत होते.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती चा विजय असो….!✊🤝🚩🚩🚩*
————————————