यशाने हुरळून व अपयशाने खचून जाऊ नका… तहसीलदार अनिरुद्ध कांबळे सरस्वती विद्यालयात वार्षिक उत्सवाचे थाटात समारोप

अर्जुनी मो.:- शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, जीवनात कधी यश तर कधी अपयश मिळते त्यामुळे यशाने हुरळून जाऊ नका तर अपयशाने खचून जाऊ नका असे मार्गदर्शन अनिरुद्ध कांबळे तहसीलदार अर्जुनी/मोर. यांनी केले. स्थानिक सरस्वती विद्यालयात वार्षिकोत्सव बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलते होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.बल्लभदास भुतडा होते. प्रमुख उपस्थिती तहसीलदार अनिरुद्ध कांबळे अर्जुनी/मोर., संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाश भैय्या, संस्थासचिव सर्वेश भुतडा,मंजुषाताई बारसागडे नगराध्यक्ष नगरपंचायत अर्जुनी/मोर,होमराजजी पुस्तोडे उपसभापती पंचायत समिती अर्जुनी/ मोर,कमलेश सोनटक्के पोलीस निरीक्षक अर्जुनी/मोर,शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्या या छाया घाटे,पर्यवेक्षक महेश पालीवाल,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शव्या जैन,समन्वयक भगीरथ गांधी,विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना भूते , वार्षिकोत्सव संयोजक प्रा. अनिल नंदेश्वर,संयोजिका अर्चना गुरुनुले,सर्व संस्था पदाधिकारी यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे सर्व दिवंगत पदाधिकारी यांचे पूजन करण्यात आले. वार्षिकोत्सव संयोजिका अर्चना गुरुनुले यांनी तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचा तसेच तीन दिवसीय वार्षिकोत्सव कार्यक्रमाचा आढावा सांगितला. प्रमुख अतिथी मंजुषाताई बारसागडे यांनी सरस्वती विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी भविष्यात नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे असे गौरवोद्गार काढले.होमराज पुस्तोडे यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वाढवावा असे सांगितले .पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे धडे दिले,तसेच सायबर क्राईम पासून संरक्षण कसे करावे याबाबतची उपयुक्त माहिती दिली.शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण यांनी क्रीडासत्र तसेच वार्षिकोत्सव आयोजनामुळे विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित झाले त्यांच्यात चुरस व स्पर्धा निर्माण झाली जी भविष्यात त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन केले. संस्थासचिव सर्वेश भुतडा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करताना अभ्यासाबरोबर खेळ सुद्धा महत्त्वाचे आहे असे सांगितले.संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाश भैय्या यांनी विद्यार्थ्यांच्या यशात शाळेतील प्रत्येक घटकाची मेहनत असते असे मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून संस्थाध्यक्ष बल्लभदास भुतडा यांनी मेहनतीचे फळ नेहमी गोड असते,यश हे ध्येय नसून एक यात्रा आहे असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी वार्षिकोत्सव अंतर्गत विविध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुजित जक्कुलवार व दिपाली कोट्टेवार यांनी केले तर आभार वार्षिकोत्सव संयोजक प्रा. अनिल नंदेश्वर सर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी साठी सर्व शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.