स्नेहसंमेलनामुळे शिक्षक -विद्यार्थ्यांचे नाते दृढ होतात… जेष्ठ साहित्यिका विजया ब्राह्मणकर सरस्वती विद्यालयात वार्षिकोत्सवाचे थाटात उद्घाटन
Summary
अर्जुनी/मोर. स्थानिक सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर. येथे बालपण पुन्हा येत नाही. त्यामुळे बालपण भरभरून जगा,कुठेही चुकीचा निर्णय घेऊ नका. स्पर्धा नेहमी स्वतःशी ठेवा, अपयशाने खचून जाऊ नका अपयशापलीकडेही जग असते. जिद्द, चिकाटी ठेवा, आनंद दिल्याने आनंद मिळतो. स्नेहसंमेलनामुळे शिक्षक-विद्यार्थी नाते […]

अर्जुनी/मोर. स्थानिक सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर. येथे बालपण पुन्हा येत नाही. त्यामुळे बालपण भरभरून जगा,कुठेही चुकीचा निर्णय घेऊ नका. स्पर्धा नेहमी स्वतःशी ठेवा, अपयशाने खचून जाऊ नका अपयशापलीकडेही जग असते. जिद्द, चिकाटी ठेवा, आनंद दिल्याने आनंद मिळतो. स्नेहसंमेलनामुळे शिक्षक-विद्यार्थी नाते दृढ होतात.या शाळेतील शिस्त,संस्कार व शिक्षण खरोखरच वाखण्याजोगी आहे असे गौरवोद्गार जेष्ठ साहित्यिका विजया ब्राह्मणकर यांनी केले. स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,जी.एम.बी.हायस्कूल व जुनियर कॉलेज,एस.डी.कॉन्वेंट,सरस्वती विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिकोत्सव सोहळ्याचे आयोजनप्रसंगी उद्घाटिका म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केशरबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाशजी भैया,उद्घाटक विजया ब्राह्मणकर ज्येष्ठ साहित्यिका नागपूर, प्रमुख मार्गदर्शक अजय कुलकर्णी प्रोफेसर आणि मराठी विभाग प्रमुख अँड बेरार महाविद्यालय नागपूर,तर प्रमुख उपस्थिती संस्था सचिव सर्वेश भुतडा,प्राचार्य जे.डी. पठाण, उपप्राचार्या छाया घाटे,पर्यवेक्षक महेश पालीवाल, संस्थेचे सर्व पदाधिकारी,सर्व शाळांचे प्रमुख,वार्षिकोत्सव संयोजक प्रा.अनिल नंदेश्वर,अर्चना गुरुनुले यांची होती. सर्वप्रथम माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे सर्व दिवंगत पदाधिकाऱ्यांचे पूजन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक अजय कुलकर्णी यांनी संस्कार,आधुनिक दृष्टिकोन यात तरुण पिढी कोठेही कमी नाही,विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल करावी भविष्यातील बदलांना सामोरे जावे असे मार्गदर्शन केले.शाळेचे पर्यवेक्षक महेश पालीवाल यांनी सर्व मान्यवरांचा जीवन परिचय करून दिला.आपल्या प्रास्ताविक मार्गदर्शनातून जी.एम.बी. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य शव्या जैन यांनी शाळेची उत्तरोत्तर होत असलेली प्रगती याविषयीची सविस्तर माहिती दिली.शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हेच वार्षिकोत्सव आयोजनाचे उद्दिष्ट आहे.तसेच शाळेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली व हे संस्थेच्या दूरदृष्टी व सहकार्यामुळे शक्य होऊ शकले याबद्दल संस्थेचे आभार मानले.संस्थासचिव सर्वेश भुतडा यांनी विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा,संयमाने विद्यार्थी धैर्यशील बनतो असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयप्रकाशजी भैया यांनी वार्षिकोत्सवामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे दार उघडते,विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस असाच वाढत राहील शाळेतील सर्व घटक त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली व सर्वांना वार्षिकोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.वार्षिकोत्सवाचे औचित्य साधून एच.एस.सी. बोर्ड २०२४ मध्ये विज्ञान शाखेतून बोर्डातून प्रथम आलेला विद्यार्थी आदेश शरद देशमुख यास संस्थेतर्फे रौप्य पदक,तसेच कला शाखेतून जिल्ह्यातून प्रथम आलेली विद्यार्थिनी प्रेरणा अशोक दहिवले,एच.एस.सी बोर्ड २०२४ मध्ये जी.एम.बी.महाविद्यालयातून प्रथम आलेला वेदांत रेशीम परशुरामकर, एस.एस.सी.परीक्षा मार्च २०२४ शाळेतून प्रथम आलेली लीना हरीष ढोमणे, एस.एस.सी.परीक्षा मार्च २०२४ जिल्ह्यातून द्वितीय आलेली जी.एम.बी.विद्यालयातील विद्यार्थिनी आचल विनायक पुस्तोडे या सर्वांना संस्थेतर्फे रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.यासोबतच क्रीडा,विज्ञान, योगा या क्षेत्रातून राज्यस्तरावर,राष्ट्रस्तरावर गेलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे रौप्य पदक व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.यात परिणीता नाकाडे विज्ञान प्रदर्शन राज्यस्तर सहभाग, स्नेहा जनार्दन भोयर राज्यस्तर कला महोत्सव सहभाग,गुंजन हेमंतकुमार कापगते अर्थशास्त्र विषयात शाळेतून प्रथम,रिया देवेंद्र नाकाडे,निकुंज देविदास हेमने योगासन स्पर्धेत सहभाग,तर अमन दिलीप लाडे राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे ट्रायबल आर्ट चित्रकला प्रदर्शनी मध्ये सुयश संपादन केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार अतिथि द्वारे करण्यात आला. सरते शेवटी विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनी, कला प्रदर्शनी,
चित्रकला प्रदर्शनी,पाककला प्रदर्शनी,रांगोळी प्रदर्शनी अशा विविध प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना हरीश ढोमणे व आरजु हेमंतकुमार गोंडाने या अकरावी विज्ञानाच्या विद्यार्थिनींनी केले.तर आभार शाळेच्या उपप्राचार्या छाया घाटे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य केले.