BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

आमदार चरणसिंग ठाकूर यांनी बहुजन हिताय!सर्वजन सुखाय ची संकल्पना मांडली

Summary

कोंढाळी/काटोल – काटोल विधानसभेचे आमदार चरण सिंग ठाकूर यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दावर चर्चेत भाग घेऊन आपल्या काटोल विधानसभा मतदारसंघातील वन्य प्राण्यांच्या हैदोसात सापडल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सोलार कुंपण, पीकांचे नुकसान करणारे वन्य प्राण्यांना मारण्याची परवानगी, तसेच महाराजा राजा भोज […]

कोंढाळी/काटोल –
काटोल विधानसभेचे आमदार चरण सिंग ठाकूर यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दावर चर्चेत भाग घेऊन आपल्या काटोल विधानसभा मतदारसंघातील वन्य प्राण्यांच्या हैदोसात सापडल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सोलार कुंपण, पीकांचे नुकसान करणारे वन्य प्राण्यांना मारण्याची परवानगी, तसेच महाराजा राजा भोज आर्थिक महामंडळाची स्थापना करून या महामंडळाच्या माध्यमातून युवक/ युवतींना रोजगार,व्यवसायाची मिळणार असे मत मांडून काटोल एम आय डी सी मधील सोलार युनीट हटवून , काटोल /नरखेड तालुक्यातील एम आय डी सी शेकडो एकर जागेवर नव नवीन उद्योग प्रक्रिया सुरू करून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
आमदार चरणसिंग ठाकूर यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातील बहूजन हिताय, सर्व जन सुखाय ही संकल्पना‌ विधानसभेत मांडली. या बाबतीत मतदारसंघातील नागरिकांनी आभार मानले असुन या चर्चेतील मुद्दे शासनाने सोडवावे अशी मागणी ही केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *