भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

सोमनाथ हत्ये प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. रोशन फुले समता सैनिक दलाचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

Summary

लाखांदूर:- परभणी येथे दिनांक १० डिसेंबर २०२४रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान शिल्पाच्या तोडफोड व त्यानंतर शांती मोर्चा मध्ये झालेला हिंसाचार व सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर देशद्रोह व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅक […]

लाखांदूर:- परभणी येथे दिनांक १० डिसेंबर २०२४रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान शिल्पाच्या तोडफोड व त्यानंतर शांती मोर्चा मध्ये झालेला हिंसाचार व सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर देशद्रोह व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याबाबद रोशन फुले अध्यक्ष समता सैनिक दल लाखांदूर यांनी मा.तहसिलदार लाखांदूर यांच्या तर्फे मा.मुख्यमंत्री महारष्ट्र यांना देण्यात आले. सदर प्रकरणात दिरंगाई झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दिनांक १०डिसेंबर २०२४रोजी परभणी येथे घडलेल्या घटनांनी संविधान प्रेमी व आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. संविधान शिल्पाची विटंबना करणे ही अत्यंत गंभीर बाब असून तो देशद्रोह आहे. यामध्ये संबंधित आरोपींवर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. व या घटनेचा मुख्य सूत्रधार शोधण्यात पोलिसांना यश आलं नाही. तसेच या घटनेमुळे शांततेत चाललेल्या आंबेडकरवादी मोर्चावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जमुळे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. शांततेत चालणाऱ्या मोर्च्यात अचानक जडफोड करणारे कोन व पोलिसांना लाठीचार्ज चे आदेश देणारे कोन याची चौकशी करने आवश्यक आहे.

या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती सखोल चौकशी करून दोषींवर देशद्रोह व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे अत्यावश्यक आहे. ज्यामुळे पुढील काळात अशा प्रकारच्या घटणा घडणार नाही व सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टातून चालविण्यात यावा या सह
सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूची चौकशी करून संबंधित पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,सोमनाथ यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी,शांतता मोर्चावर लाठीचार्ज करणाऱ्या व त्याचे आदेश देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या आरोपींवर आणि त्याच्या मुख्य सूत्रधारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,आंबेडकरवादी कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेले सर्व खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, या प्रकरणातील सर्व आरोपींवर जलद गतीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा,पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी कलम 176(1A) सीआरपीसी अन्वये करण्यात यावी,ही चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून न करता सिटींग न्यायाधीशामार्फत करण्यात यावी,लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या निर्दोष नागरिकांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी,वच्छलाबाई मानवते यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांवर कलम 354, 307 अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे व वच्छलाबाई यांना 10 लाखांची आर्थिक मदत देऊन पुनर्वसन करावे,परभणीतील सर्व पोलीस ठाण्यांतील सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त करून तपासण्यात यावे,पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनमुळे बौद्ध वस्तीतील नुकसानग्रस्त घरांची पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी,संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,१०डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या सकल हिंदू समाज मोर्चाच्या संयोजकांची चौकशी करून त्यांच्यासह सर्वांच्या भाषणांचा तपास करण्यात यावा. या मागण्यांचे निवेदन मा. तहसिलदार यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना देण्यात आले. जर सदर प्रकरणात दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, व त्याची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनावर राहील. निवेदन देतानी रोशन फुले अध्यक्ष समता सैनिक दल लाखांदूर, राहुल राऊत, सूरज प्रधान, पियुस बडोले, रोशन सोनटक्के, श्रीकृष्ण सूर्यवंशी, अस्मिता गायकवाड, देवला सुखडेवे, रेखा बागडे, युवराज सुखदेवे सा.का. आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *