रवी पटवर्धन यांच्या निधनाने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या हरहुन्नरी कलाकाराला मुकलो – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
Summary
मुंबई, दि. ६ – आपल्या भारदस्त अभिनयाने चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनाने आपण एक हरहुन्नरी कलाकाराला गमावले आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रवी पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. […]
मुंबई, दि. ६ – आपल्या भारदस्त अभिनयाने चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनाने आपण एक हरहुन्नरी कलाकाराला गमावले आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रवी पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे रवी पटवर्धन यांनी रंगभूमी असो चित्रपटसृष्टी वा दूरचित्रवाणीचा छोटा पडदा या सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवला. आपल्या अभिनयातून वैविध्यपूर्ण भूमिकांना अजरामर करणाऱ्या रवी पटवर्धन यांच्या निधनाने ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत, या शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.