विज्ञान प्रदर्शनीत सरस्वती विद्यालयाचे सुयश बाराभाटी येथे पार पडला भव्य प्रदर्शनी सोहळा
Summary
अर्जुनी/मोरगाव:- दिनांक १०व११ डिसेंबर २०२४ रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पंचशील विद्यालय बाराभट्टी येथे करण्यात आले.सदर विज्ञान प्रदर्शनी प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात घेण्यात आली.तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी सदर प्रदर्शनीत सहभाग नोंदविला. त्यात सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घवघवीत […]
अर्जुनी/मोरगाव:- दिनांक १०व११ डिसेंबर २०२४ रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पंचशील विद्यालय बाराभट्टी येथे करण्यात आले.सदर विज्ञान प्रदर्शनी प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात घेण्यात आली.तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी सदर प्रदर्शनीत सहभाग नोंदविला. त्यात सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त झाले.त्यात प्राथमिक गटात गार्गी सुरेश कुंभारे हिने ऑटोमॅटिक रेस्क्यू ब्रिज या प्रयोगासह सहभाग घेतला त्यात तिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. दिव्यांग गटातून मुकुंद लालकृष्ण करंजेकर याने फ्युचरिस्टिक इको फ्रेंडली रोड या प्रयोगासह सहभाग घेतला त्यात त्यांने प्रथम क्रमांक पटकाविला तर माध्यमिक गटातून तन्मय सिद्धार्थ जांभुळकर याने इको फ्रेंडली अँड सेफ्टी ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट या प्रयोगासह सहभाग घेतला व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष बल्लभदास भुतडा, संस्था सचिव सर्वेश भुतडा, कोषाध्यक्ष जयप्रकाशजी भैया, प्राचार्य जे.डी.पठाण,उपप्राचार्य छाया घाटे,पर्यवेक्षक महेश पालिवाल, सर्व शिक्षक वृंद यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.