प्रतिमा पलांडे स्कूल येथे स्मरणशक्ती विकास कार्यशाळा
Summary
पुणे-शिक्रापूर येथे पंडित जवारलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कस्तुरी शिक्षण संस्थेतील प्रतिमा पलांडे स्कूल येथे बालदिन साजरा करण्यात आला या बालदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध संमोहन तज्ञ, प्राचार्य डॉ जगदिश राठोड यांनी विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढावी ,व्यक्तिमत्व विकसित […]
पुणे-शिक्रापूर येथे पंडित जवारलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कस्तुरी शिक्षण संस्थेतील प्रतिमा पलांडे स्कूल येथे बालदिन साजरा करण्यात आला या बालदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध संमोहन तज्ञ, प्राचार्य डॉ जगदिश राठोड यांनी विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढावी ,व्यक्तिमत्व विकसित व्हावे , एकाग्रता वाढावी , ताण तणाव दूर व्हावे व बौद्धिक क्षमता विकास करण्यासाठी संमोहनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेऊन विविध कलागुण व स्मरणशक्ती वाढते याबाबत प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले हे मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे सुप्त कलागुणांचा विकास व्हावा यासाठी सुद्धा मार्गदर्शन केले
या स्मरणशक्ती विकास कार्यशाळेचे आयोजन बिहार विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ पंडित पलांडे सर व कस्तुरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा लॉ कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ जयश्री पलांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात झाले . तसेच या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारे शिकवल्या जाणाऱ्या विषयाचे कशाप्रकारे स्मरणशक्तीसाठी कोणत्या टेक्निक वापरायच्या याबाबत मार्गदर्शन केले गेले. कार्यक्रमात प्रतिमा पलांडे स्कूलचे प्राचार्य श्री पंकज वरुडकर तसेच उप मुख्याध्यापिका मेघा वरुडकर, शिक्षिका कल्पना धुमाळ ,स्वाती चने,दिपाली खंडाळे , दिपाली बेळगाव, दिपाली भोगल , शैलजा तेलंग , प्रियंका अग्रवाल , जयश्री शेळके इत्यादी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे संचालन स्वाती चन्ने मॅडम ने केले तर आभार प्रियंका अग्रवाल यानी मानले . अशा प्रकारे प्रतिमा पलांडे स्कूलमध्ये मनाचे नियंत्रण करून स्मरणशक्ती वाढवण्याचा कार्यक्रम थाटात संपन्न झाला