दूर दृष्टी -दृढ़ निश्चय-पक्का इरादा हीच चरणसिंग ठाकूर यांचे विजयाचा पाया अखेर गुलाल महायुतीचाच. विक्रमी मतांनी चरणसिंग ठाकूर यांचा विजय

काटोल –
काटोल विधानसभेत अपेक्षित मतदान झाले. या मतदानाने महायुती चे(भा ज पा) उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या संगठन कौशल्य, राजकिय दूर दृष्टी -दृढ निश्चय – पक्का ठेऊन राजकीय वाटचाली चे फलीत विदर्भातील सर्वात हॉट सीट म्हणजे काटोलचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे बालेकिल्ल्यातील विजय हा साधा विषय नाही.
१९८०पासून एक सार्वसामान्य कांग्रेस चा कार्यकर्ता ते २०२४साली महायुती चे (भाजपचे ) आमदार या पदावर येण्यासाठी विविध शासकीय पक्षांचा दांडगा अनुभवाचा फायदा झाला.
चरणसिंग ठाकूर यांनी आपल्या भागाचा विकास हा एकच ध्यास घेऊन आपल्या भागातील विकासासाठी सत्ताधारी पक्षासोबत जुळून घेत, आपले होम टाऊन काटोल नगर परिषद चे अध्यक्ष,गट नेता, म्हणून काटोल नगर परिषदे चां सर्वांगीण विकास करत आदर्श नगर परिषद चां पुरस्कार मिळवून दिला.
फक्त काटोल नगर परिषदेचा विकासावरच ते थांबले नाहीत तर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी नियुक्ती चे ही संधी चे सोने करीत काटोल विधानसभेतील नरखेड -काटोल-नागपूर ग्रामीण चे बाजार गाव च्या भागातील विकासासाठी निधी खेचून आणला.
चरणसिंह ठाकूर हे निव्वळ राजकारणात तर सक्रिय नसुन धार्मिक क्षेत्रातील विकास कामे हाती घेत श्री क्षेत्र पारडसिंगा येथील माता अनुसया या मंदिराचा विकास तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. सोबतच काटोल विधानसभा मतदारसंघातील अनेक धार्मिक स्थळे क वर्ग क्षेत्र मंजुरी मिळवून दिली.
राजकिय -धार्मिक क्षेत्रासोबतच सहकार क्षेत्रात ही त्यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महत्त्वाची गणल्या जाणारी काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या गटाचे ताब्यात घेऊन सहकार क्षेत्रातील पकड या सर्वातून काटोल विधानसभा मतदारसंघातील सोशल इंजिनिअरिंगवर जोर देत सोबतच अत्यंत सौम्य सरळ मार्गाने आपला राजकिय प्रवासादरम्यान जनहिताचे विकास कामात आडकाठी आणनारे अधिकारी व कर्मचारी यांना वेळीच वठणीवर येण्याची सुचना देत जन विकास साधत मतदार संघातील सर्वात अधीक मतदार असलेला कुणबी त्यानंतर तेली, माळी , एस सी ,एस टी व अन्य प्रवर्गातील ज्येष्ठ व मान्यवर नेत्यांना मानाचे स्थान देत आपल्या सोबत घेतले.
काटोल विधानसभा मतदारसंघातील बहूतेक सर्व समाजाचे संगठणा सोबत जुळून असल्याने
आजच आमदारकी चां गुलाल अखेर चरणसिंग ठाकूर व त्यांच्या महायुती चे सोबत्यांसह भा ज पा पदाधिकारी यांनी उधळला.
चरणसिंग ठाकूर विक्रमी मतांनी विजयी
काटोल विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या मतदानात अनिल देशमुख यांना 2019 मध्ये 98 हजारांहून अधिक मते मिळाली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काटोल विधानसभेच्या मतदारांनी चरणसिंग ठाकूर हे 1,04336 विक्रमी मते घेऊन हजार मतांनी विजयी झाले आहेत
तरी सलिल देशमुखांचा पराभव
यात महाविकास आघाडी (एन सी पी/शरदचंद्र पवार) चे सलील देशमुख यांना 65522 मिळाली आहे.तर अपक्ष याज्ञवल्क्य जिचकार यांना तिसऱ्या क्रमांकाची 13922 माळाली असून शे का प चे राहूल देशमुख यांना 6182 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली.
एन सी पी चे सलील देशमुख यांचा मतदारसंघातील जनसंपर्क, विकास कामांचा पाठपुरावा , आरोग्य सेवा पुरविण्यात कमी पडले नाही, बहूजन सुखाय बहूजन हिताय चे कामे करत मतदारसंघातील जनसंपर्क ठेवला. मतदान निकालात 65522 मते मिळाली .
सतत जनहिताचे कामे करूनही पराभव झाला. हा राजकिय नेत्यांसाठी अभ्यासाचा विषय आहे.