महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कोवीड मध्ये काम केलेल्या कंत्राटी तंत्रज्ञांची दिवाळी अंधारात..!

Summary

मुंबई महापालिकेच्या केईएम रूग्णालय , नायर रूग्णालय ,शीव रूग्णालय ,कुपर रूग्णालय तसेच उपनगरीय रूग्णालयांत सुमारे ५-६ वर्षांपासुन कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडीत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. कोविड काळात जोखिम पत्करुन,रूग्णालयीन सेवा पुरविणार्या सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा […]

मुंबई महापालिकेच्या केईएम रूग्णालय , नायर रूग्णालय ,शीव रूग्णालय ,कुपर रूग्णालय तसेच उपनगरीय रूग्णालयांत सुमारे ५-६ वर्षांपासुन कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडीत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
कोविड काळात जोखिम पत्करुन,रूग्णालयीन सेवा पुरविणार्या सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा ऐन दिवाळीतच खंडीत केल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे, ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’ चे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे- बापेरकर यांनी म्हटले आहे.
पालिकेच्या सर्वच रूग्णालयांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ,प्रयोगशाळा सहाय्यक,क्ष किरण तंत्रज्ञ, क्ष किरण सहाय्यक ,डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस सहाय्यक यांची अनेक पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदांच्या सापेक्ष पालिकेने कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करुन घेतले होते. सदर कंत्राटी नियुक्तींचे वेळोवेळी नुतनीकरण करण्यात येत होते.
तथापि, जानेवारी २०२५ पर्यंत नुतनीकरण मिळालेल्या वरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर नंतर ड्युटीवर येऊ नका असे संबंधित रूग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. असे झाले तर कार्यरत कर्मचांर्यांवर कामाचा ताण पडणार असुन, अपुर्या कर्मचारी वर्गामुळे रुग्णालयीन सेवा कोलमडू शकते. त्यामुळे रिक्त पदभरती होईपर्यंत वरील पदांवर कंत्राटी पद्धत चालू रहावी यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचे नुतनीकरण करावे अशी मागणी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’ चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे- बापेरकर यांनी आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *