सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिवादन
Summary
मुंबई, दि. 31 : देशाचे माजी उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त तसेच माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय […]

मुंबई, दि. 31 : देशाचे माजी उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त तसेच माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. राज्य शासनातर्फे सुरु असलेल्या ‘दक्षता जागृती सप्ताहा’निमित्त राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविला.
0000