बनावट फेसबुक आयडी फसवेगिरी पासून सावधान भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे नागरीकांना आव्हान

भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांनी जनतेला सायबर गुन्हेगार हे वरीष्ठ पोलीस अधिकारी किंवा शासकीय अधिकारी यांचे नावे बनावट फेसबुक आयडी, तयार करून नागरीकांना संपर्क करून स्वतः पोलीस अधिकारी किंवा शासकीय अधिकारी असल्याचे भासवून, त्यांचे ओळखीचे आर्मी अधिकारी यांची बाहेर राज्यात बदली झाली आहे . त्यांचे घरघुती फर्निचर , साहित्य, स्वस्त दरात विक्री करणे आहे. असे आमिष दाखवून किंवा त्यांना तात्काळ उधारी रुपयांची आवश्यकता आहे. असे भासवून नागरीकांन कडून एडवांस उधारी रुपयांची मागणी करुन नागरीकांनची आनलाईन आर्थीक फसवणूक सायबर गुन्हेगार यांच्या कडून जिल्ह्यात सुरू आहे.
भंडारा जिल्हा पोलीस दला तर्फे भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येत आहे की, या प्रकारची फसवेगिरी बनावट फेसबुक, अकाउंट तयार करून आपणास सायबर गुन्हेगारांन कडून संपर्क केल्यास त्यांचे आमिषाला व भुलथापेला बळी पडू नये, व कोणतेही आर्थिक व्यवहार करु नये. या प्रकारच्या फसवेगिरी सायबर गुन्हेगारां पासून सावध राहावे असे आव्हान भंडारा पोलीस दला तर्फे करण्यात आले आहे. व भंडारा पोलीस सर्दैव आपले सेवेशी तत्पर आहे.