साहेब -!!!!आमचे पाल्यांना वाढिव प्रवेश कधी मिळणार पालकांची आर्त हाक विद्यार्थी -विज्ञान शाखेत वाढिव प्रवेश प्रतिक्षेत पालकांच्या शाळेत चकरा वाढिव प्रवेश मंजूरी अजून मिळाली नाही शहरात विद्यार्थी मिळे ना! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल ना!!! शिक्षण विभागाचा आडमुठेपणा
Summary
काटोल/कोंढाळी – सध्या राज्यात. विशेषतः नागपूर जिल्ह्यातील शिक्षण विभागात, नागपूर शहरातील उच्च माध्यमिक शिक्षण शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा तुटवडा आहे. शहरात विद्यार्थी मिळत नाही. मात्र ग्रामीण आदिवासी बाहूल भागातील उच्च माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा मधे आर्थिक अडचणीतील गरीब व होतकरू व शिक्षणाची […]
काटोल/कोंढाळी –
सध्या राज्यात. विशेषतः नागपूर जिल्ह्यातील शिक्षण विभागात, नागपूर शहरातील उच्च माध्यमिक शिक्षण शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा तुटवडा आहे. शहरात विद्यार्थी मिळत नाही. मात्र ग्रामीण आदिवासी बाहूल भागातील उच्च माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा मधे आर्थिक अडचणीतील गरीब व होतकरू व शिक्षणाची गोडी असलेले विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी शेकडो विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतिक्षेत आहेत.
आता शहरी भागातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांमिळत नाही या करीता आदिवासी बाहूल भागातील शाळांमध्ये वाढिव प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास अजुन ही मंजुरी देण्यात येत नसल्या मुळे काटोल तालुक्यातील विद्यार्थ्यांना ११वी चे प्रवेशापासून वंचित रहावे लागू शकते.
या करीता पालकांनी सर्व -लोक सेवकांना विनंती केली आहे की काटोल तालुक्यात काटोल व कोंढाळी येथील आदिवासी बाहूल भागातील ११वी विज्ञान/कला/वाणिज्य शाखेच्या वाढीव प्रवेशा करीता फार विनवण्या
केल्यावरही मंजुरी मिळत नाही , मागील दोन वर्षा आधी नोव्हेंबर मधे मंत्री महोदयांचे कार्यालयाकडे माहिती दिली तेंव्हा डिसेंबर ला मंजूरी मिळाली होती. २०२३मधे तर वाढीव प्रवेश मंजूरी मिळाली नव्हती.
साहेब आता
विधान परिषद आमदार म्हणून माननीय अडबाले साहेब व शिक्षण तज्ञ म्हणून माननिय अभ्यंकर साहेब सरकार प्रतिनीधी आहेत.
कृपया वाढिव प्रवेश मंजूरी प्रकरणी एकदाचा सोक्ष मोक्ष लागावा हिच अपेक्षा पालकांनी बाळगली आहे.
शेवटी -माननिय शिक्षण मंत्री, पालकमंत्री, स्थानिक आमदार, शिक्षण तज्ञ आमदार ,जि प सदस्य,जिल्हाधिकारी, शिक्षण अधिकारी या सर्वांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मार्ग काढावा हि अपेक्षा पालकांनी केली असून शेवटचा प्रयत्न म्हणून नागपूर उप संचालक यांना भेटून वाढिव प्रवेशाची मागणी करण्यात येणार आहे.
या प्रकरणी बी ई ओ काटोल जनबंधू यांना विचारले असता त्यांनी सांगितले की हा प्रश्न जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक नागपूर तेच सांगू शकतील,. नागपूर जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक कुंभार मैडम यांना भ्रमण ध्वनी क्रमांकावर संपर्क साधला पण उत्तर मिळाले नाही. तसेच उपसंचालक नरड यांना ही वारंवार भ्रमण ध्वनी क्रमांकावर संपर्क साधला पण प्रतिसाद मिळाला नाही.
आता पालकांनी येथील प्राचार्यांना धारेवर धरले पण वाढिव प्रवेश मंजूरी मिळाली नाही असे सांगितले.
तर पालक थेट उपसंचालक यांना भेटणार असे पालक महेश झाडे यांनी सांगितले आहे.