मुंबई महापालिकेत IAS होणे सोपे मात्र लिपिक होणे कठीण ! कर्मचारी सेना
Summary
बृहन्मुंबई महानगर- पालिकेने दि.२०/०८/२०२४ रोजी ‘कार्यकारी सहाय्यक’(लिपिक) पदांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. ‘पहिल्याच प्रयत्नात पदवी परिक्षा उत्तीर्ण असावे’, ही जाहिरातीमधील जाचक अट रद्द करावी, यासाठी शिवसेना नेते, आमदार आदित्यजी ठाकरे यांनी आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र दिले आहे. याच पत्राच्या […]
बृहन्मुंबई महानगर-
पालिकेने दि.२०/०८/२०२४ रोजी ‘कार्यकारी सहाय्यक’(लिपिक) पदांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. ‘पहिल्याच प्रयत्नात पदवी परिक्षा उत्तीर्ण असावे’, ही जाहिरातीमधील जाचक अट रद्द करावी, यासाठी शिवसेना नेते, आमदार आदित्यजी ठाकरे यांनी आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र दिले आहे. याच पत्राच्या अनुषंगाने ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी जाहिरातीतील जाचक अटी वगळुन शुध्दीपत्रक काढण्याची मागणी केली आहे. कार्यकारी सहाय्यक पदासाठी Qualifying exam. घेतली जाणार असेल तर पदवी परिक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असणे ही अट का ठेवण्यात आली? असा थेट प्रश्न विचारुन, UPSC, MPSC तसेच ईतर स्पर्धात्मक परिक्षांसाठी अश्या अटी ठेवल्या जात नाहीत, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सदर अट पालिकेने कायम ठेवली तर भविष्यात उमेदवार IAS बनु शकतील पण मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक बनू शकणार नाहीत, अशी खंत डॉ.बापेरकर यांनी व्यक्त केली आहे.
काही विशिष्ट प्रवर्गातील उमेदवारांना टंकलेखन(Typing) परिक्षा नियुक्तीपासुन २ वर्षात उत्तीर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे ती सरसकट सर्वच उमेदवारांना देण्यात यावी. जेणेकरुन उच्चशिक्षित उमेदवारही अर्ज करु शकतील अशी मागणी युनियनने केली आहे.
पालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांची मुले अत्यंत प्रतीकुल परिस्थितीत शिक्षण घेतात, पदवी/ द्वीपदवीधर होतात. परंतु अनुकंपा तत्वावर किंवा अग्रहक्काने नोकरी मिळविण्याची वेळ येते तेव्हा ‘पहिल्याच प्रयत्नात पदवीधर’ या अटीमुळे त्यांना ‘कामगार’ पदासाठीच पात्र ठरविले जाते.म्हणजेच पदवी/द्वीपदविधर असुनही या कर्मचाऱ्यांच्या मुलांना ‘लिपिक’ पदी नियुक्ती दिली जात नाही.असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
जाहिरातीतील जाचक अटी वगळुन ‘कार्यकारी सहाय्यक’(लिपिक) पदाची अहर्ता सुधारीत करण्यात यावी व तसे शुध्दीपत्रक जारी करावे अशी विनंती कर्मचारी सेनेने पालिका आयुक्तांना केली आहे.