तिरंगा ध्वजासह हुतात्मा स्मारकावर पोहचून क्रांतीवीरांना नमन लाखोटीया भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे तिरंगा रैली
कोंढाळी –
महात्मा गांधीजींनी 09ऑगष्ट 1942 रोजी छोडो भारत व करेंगे या मरेंगे चा नारा दिला होता. महात्मा गांधी यांच्या या नार्याने संपुर्ण देश पेटून उठला होता. शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणारे महात्मा गांधी यांनी प्रथमच क्रांती ची भाषा केली होती.त्यामुळे 09आगष्ट हा क्रांती दिवस साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्फूर्तीदायी ठरलेल्या या दिवसाची आठवण क्रांतीकारकांच्या त्याग व बलिदानाची जाणीव नव्या पिढीला व्हावी म्हणून शुक्रवार 09 आगष्ट रोजी नागपंचमी चां सण असुनही येथील लाखोटीया भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वतिने हजारों विद्यार्थी/ विद्यार्थ्यांनीना हतात तिरंगा घेऊन भारत माता की जय वंदेमातरम् चे जय घोषात प्रभात फेरी काढून कोंढाळी येथील (स्वातंत्र्य सेनानी शामराव उकाडा (न्हावी) जिचकार यांचे)हुतात्मा स्मारकात पोहचून शाळेकरी विद्यार्थ्यी, प्राचार्य व शिक्षक, ग्राम अधिकारी तसेच पोलीस स्टेशन कोंढाळी व राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा पोलीस पथक व ज्येष्ठ नागरिकांचे उपस्थितीत हुतात्म्यांना पुष्प चक्र वाहुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य सुधीर बुटे यांनी कोंढाळी येथील हुतात्मा स्मारकाबाबत माहीत देण्यात आली.हजारों शालेय विद्यार्थ्यांनी वीर शहिदांना मानवंदना देत राष्ट्रगीतागातांनंतर मुख्य मार्गावरून तिरंगा ध्वज सह प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी दरम्यान कोंढाळी पोलीस, महामार्ग सुरक्षा पोलीस व शालेय विद्यार्थ्यांचे ह्वालेंटीयरस् यांनी बंदोबस्त हातळला..