केदारपूर येथील वन क्षेत्रात वन पर्यटन व एडवेंचर पार्क साठी दोन कोटी ३०लाखांची मंजुरी सलील देशमुख यांच्या प्रयत्नांना यश वन मंत्र्यांचे मानले आभार
Summary
काटोल/कोंढाळी-प्रतिनीधी नागपूर वन विभागाच्या कोंढाळी वन परिक्षेत्रांतांरगत येणाऱ्या केदारपुर येथील वन व पर्यटन व एडवेंचर पार्क साठी राज्याचे माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी कोंढाळी वन परिक्षेत्रांतांरगत चमेली वन विश्राम गृहात घेतलेल्या बैठकीत केदारपुर येथील वन क्षेत्रात वन पर्यटन […]
काटोल/कोंढाळी-प्रतिनीधी
नागपूर वन विभागाच्या कोंढाळी वन परिक्षेत्रांतांरगत येणाऱ्या केदारपुर येथील वन व पर्यटन व एडवेंचर पार्क साठी राज्याचे माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी कोंढाळी वन परिक्षेत्रांतांरगत चमेली वन विश्राम गृहात घेतलेल्या बैठकीत केदारपुर येथील वन क्षेत्रात वन पर्यटन विकासासाठी प्रस्ताव बनविण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार वन विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता.
या दरम्यान नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी वन विभागाचे सचीव यांचे कडे वारंवार संपर्क करून व शेवटी वन मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे ही वारंवार पाठपुरावा करून अखेर नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी केदारपूर येथील वन पर्यटन विकासासाठी दोन कोटी ३०लाखांचे निधी साठी मंजुरी दिली आहे अशी माहिती सलील देशमुख यांनी दिली आहे