हेडलाइन

अनखोडा – जैरामपूर मार्गावरील नाल्याच्या काठावरील खड्डा देत आहे अपघाताला आमंत्रण

Summary

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनखोडा – जैरामपूर मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे या भागातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या अनखोडा गावाजवळील पुलाच्या एका बाजूला गेल्यावर्षीच्या अती पावसाने मोठा खड्डा पडला असून या पुलावरचा खड्डा मोठ्या अपघाताला […]

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनखोडा – जैरामपूर मार्गावरील
रस्त्यांची दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे या भागातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या अनखोडा गावाजवळील पुलाच्या एका बाजूला गेल्यावर्षीच्या अती पावसाने मोठा खड्डा पडला असून या पुलावरचा खड्डा मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे. या भागातील रस्त्याच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे मात्र सदर खड्डा व मार्ग दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. अनखोडा – जैरामपूर हा अत्यंत महत्वाचा व नेहमी वर्दळ राहत असलेला मार्ग आहे. या मार्गावरून रामपूर,कढोली,जैरामपूर आदी गावातील नागरिक नेहमीच विविध कामांसाठी आष्टी येथे येतात. आपले काम आटोपून सायंकाळी गावाकडे जात असतांना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनधारकांना खड्डे चुकविणे शक्यच होत नाही. एक खड्डा चुकविताच दुसरा खड्डा पडतो. खड्ड्यांमुळे वाहने भंगार होण्याच्या स्थितीत असून वाहनधारकांनाही पाठ व मनक्याचे त्रास वाढले आहेत. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. अजूनपर्यंत सदर मार्गाची डागडुजीसुद्धा करण्यात आली नाही. मार्गाची दुर्दशा बघितली तर सदर मार्गाची डागडुजी करण्याऐवजी नवीन बांधकाम करणेच योग्य राहील, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी हि समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देत नाही. परिणामी या समस्यांचा त्रास येथील नागरिकांना करावा लागत मात्र बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने या परिसरातील वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गाची तत्काळ दुरूस्ती व अनखोडा गावाजवळील नाल्याच्या काठावरील खड्डा बुजवण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *