मराठा सेवा संघातर्फे गुणवंतांचा सत्कार प्रत्येक क्षेत्रात संधी प्रा. पुनीत मातकर

प्रत्येक क्षेत्रात नोकरीच्या व व्यवसायाच्या भरपूर संधी आहेत मात्र त्या शोधता आल्या पाहिजेत व त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी असली पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) चे अधिव्याख्याता प्रा. पुनीत मातकर यांनी स्थानिक शिवाजी इंग्लिश अकॅडमी स्कूलमध्ये मराठा सेवा संघातर्फे आयोजित छत्रपती शाहू महाराज जयंती व इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात प्रमुख वक्ते म्हणून केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश लडके, उद्घाटक म्हणून महाराष्ट्र अनिस चे राज्य सहकार्यवाहक विलास निंबोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हर्षाली निंबारते, माजी जिल्हाध्यक्ष दादाजी चापले, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव गोविंदराव बानबले, दि गडचिरोली नागरी सह. पतसंस्थेच्या मानस सचिव सुलोचना वाघरे , जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष कविता झाडे आदी मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना प्राध्यापक मातकर म्हणाले विद्यार्थ्यांनी कल चाचणी द्वारे क्षेत्राची निवड करावी तसेच त्या क्षेत्रमध्ये असलेली आवड, क्षमता व उपलब्ध संधी याचा विचार करायला पाहिजे. उद्घाटनिय भाषणात विलास निंबोरकर यांनी विद्यार्थ्यांनी व सर्व नागरिकांनी कर्मकांडातून बाहेर पडून आपला शाश्वत विकास साधावा असे आवाहन केले. यावेळी स्व. खुशालराव वाघरे यांचे स्मृति निमित्त सन्मानचिन्ह चे प्रायोजक म्हणून सुलोचना वाघरे तसेच एज्यूस्टेप टुटोरियल्स चे संचालक अमोल चापले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी इयत्ता दहावी व बारावीतील 85 टक्के वरील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
*इयत्ता दहावी Ptsd* :- रोहित कुथे ,क्षितिजा भांडेकर, नंदिनी धुळसे, आयर्न मडकावडे, अस्मिता नरोटे, स्वीटी नंदनवार, खुशबू कोल्हे, नेहा ठाकरे, एकविरा राठोड, कल्याणी मोडक, तनुश्री कोटगले, मनस्वी सहारे, गुंजन मेश्राम, मेहुल हलवादिया, शेख यासीर अब्दुल्ला वकील अहमद, चैतन्य सोनुले, महिमा वालदे, जानवी मांदाळे, आयर्न दुधबावरे, श्रुती कानेकर, पूर्वा काटे, गौरव कुतिरकर, कांचन मेश्राम , विनय पाल, कुणाल भांडेकर, पारस राऊत, क्रिश लडके, गुंजन ब्राह्मणवाडे, मनीष मंडल, आदित्य ढवळे, तेजस वाजेकर, आर्या गोंगल, ओम गोहणे, आदित्य घोटेकर, तेजस गावतुरे जानव्ही रामटेके, लावन्या बोधनकर, प्राची तीवाडे, राजश्री खांडरे धनश्री मेश्राम, समीक्षा डोंगरे, वैभवी सोनुले, मंजिरी शामकुळे, प्राची जुमनाके, हर्ष चलाख, यश
मडावी, तोक्शी देशमुख, मोक्षाली कुमरे ,फाल्गुन मशाखेत्री विशेष कोलते , सक्षम म्हशाखेत्री ,दर्शक सुखदेवे नेताजी नवघरे, साई घासगंटीवार,
इयत्ता बारावी मधून :- रुपेश कोहाडे, यश नागोसे, आर्या म्हशाखेत्री, रेवा मेश्राम, प्रियंका बाला, तमन्ना मोगरकर, तनिष्का खांडरे, सुमुख भांडेकर, आर्या मणे, छकुली मेश्राम, प्रज्ञा फुलझेले, अमित शंकरवार, गौरव बर्लावार ,शालिक खेडेकर ,पवन चौधरी, कार्तिक बांगरे सुमित लटारे, आयुष पिल्लीवार, प्रीतम गावतुरे इत्यादीचा सन्मानाचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती दुधबावरे ,संचालन योगिता आदे, तर आभार रामकृष्ण ताजने यांनी मानले . कार्यक्रमाला एस टी विधाते, दादाजी चुधरी, चंद्रकांत शिवणकर,पांडुरंग नागापुरे, शेषराव येलेकर,शरद ब्राम्हणवाडे, त्र्यंबक करोडकर, दीपक मोरे, राजेंद्र उरकुडे, राजेंद्र हिवरकर सह समाजबांधव, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.