कोल्हापुर महाराष्ट्र हेडलाइन

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सुरूवात

Summary

कोल्हापूर, दि. २६ :  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त संपूर्ण जिल्हयात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले जणार आहेत. याचे उद्घाटन व सुरूवात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते कंदलगाव येथे वृक्ष लावून झाली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि ग्रामपंचायत कंदलगाव यांच्या संयुक्त […]

कोल्हापूर, दि. २६ :  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त संपूर्ण जिल्हयात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले जणार आहेत. याचे उद्घाटन व सुरूवात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते कंदलगाव येथे वृक्ष लावून झाली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि ग्रामपंचायत कंदलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कंदलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणावर वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचेहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक, तहसिलदार स्वप्निल रावडे, गट विकास अधिकारी विजय यादव, सरपंच राहूल पाटील यांचेसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत सरपंच राहूल पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *