BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

आमिष देणाऱ्या ॲप्स (योजना)पासून जनतेने सावध राहावे भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेस आवाहन

Summary

भंडारा जिल्हा प्रतिनिधी, आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापर जास्त प्रमाणात होत असल्यामुळे विकासात भर पडलेले दिसून येत असले तरी फसवणुकीचे प्रकारात सुद्धा दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या फोन कॉल वर बोलणे करून त्यांना […]

भंडारा जिल्हा
प्रतिनिधी,
आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापर जास्त प्रमाणात होत असल्यामुळे विकासात भर पडलेले दिसून येत असले तरी फसवणुकीचे प्रकारात सुद्धा दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या फोन कॉल वर बोलणे करून त्यांना आपले एटीएम, पिन क्रमांक देणे ,पासवर्ड सांगणे ओटीपी सांगणे ,यासारख्या घटना घडवून त्यांचे खात्यातून पैसे गेल्याच्या घटना या जुन्या झाल्या आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यातील काही दिवसापूर्वी बोरा बँड ॲप मध्ये जनतेने लाख रुपये गुंतवणूक केले परंतु अचानक बोरा बँड बंद पडल्याने जनतेचे लाखो रुपये लंपल झाल्याने पोलीस स्टेशन भंडारा येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे. त्याच धर्तीवर प्रॉडस्टर यांनी नवीन चक्कर लावत बोरा बँड चे नवीन वर्जन ॲड्रॉमॅक्स प्रो अँप्स सध्या भंडारा जिल्ह्यात आणलेले आहे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात सध्या ह्या नवीन वर्जन ॲड्रॉमॅक्स प्रो ने धुमाकूळ घातला आहे. सदर ॲड्रॉमॅक्स प्रो ॲप्स
भंडारा जिल्ह्यातील भोळीबळी जनता कमी दिवसात दाम दुप्पट रक्कम मिळण्याचे अमिशाला बळी पडत दिसत आहे. त्याकरिता भंडारा जिल्हा पोलीसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की यासारख्या प्रलोभनाज बळी पडू नये.
सध्याच्या काळात फसवणूक करणारा व्यक्ती हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बनवून जनतेला कमी दिवसात दाम दुप्पट रक्कम देण्याचे आम्ही दाखवतात व लोकांकडून मोठ्या रकमाची गुंतवणूक करून घेतात काही दिवसानंतर असे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अचानक बंद केली जातात व नागरिकांचे गुंतलेले मूळ पैसे परत न करता फसवणूक केली जाते ,भंडारा जिल्हा पोलिसातर्फे नागरिकांना आव्हान करण्यात येते की यासारख्या प्रयोग नागरिकांना पैसे गुंतवणूक करावयाची असल्यास भारत सरकार अंतर्गत एसबीआय( सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) द्वारे मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्म महत्त्व अधिकृत करूनच गुंतवणूक करावी असे सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया,
अनधिकृत /फसव्या ट्रेडिंग/ प्लॅटफॉर्म ॲपद्वारे आकर्षक परतावा किंवा कमी दिवसात दाम दुप्पट रक्कम देणे यासारख्या प्रलोभनाज नागरिकांनी बळी पडू नये आपल्या कष्टाचे मेहनतीचे पैसे फसव्या भ्यॲप्स मध्ये गुंतवणूक करू नये किंवा ही बंद होऊन आपले सोबत फसवूनूक होऊ शकते करिता नागरिकांनी सावध राहावे असे निर्देश दि. १९/०६/२०२४पासून
देण्यात आले आहे.

लोहित मतानी
पोलीस अधीक्षक भंडारा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *