महाराष्ट्र हेडलाइन

आपल्या अधिकारासाठी अधिवेशनात सामील व्हा डॉ बबनराव तायवाडे

Summary

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन पंजाब राज्यातील अमृतसर येथे 7 आगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने 27 मे रोजी गडचिरोली येथील कात्रटवार कॉम्प्लेक्स मधील कमल केशव सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ओबीसींच्या अधिकारासाठी ओबीसी महाधिवेशनात ओबीसी बांधवांनी […]

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन पंजाब राज्यातील अमृतसर येथे 7 आगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने 27 मे रोजी गडचिरोली येथील कात्रटवार कॉम्प्लेक्स मधील कमल केशव सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ओबीसींच्या अधिकारासाठी ओबीसी महाधिवेशनात ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सामील व्हा असे आव्हान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी केले.यावेळी केंद्रीय कार्यकारिणीचे महासचिव सचिन राजुरकर, उपाध्यक्ष शेषराव येलेकर, कोषाध्यक्ष गुनेश्वर आरेकर सहसचिव शरद वानखेडे प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे , जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, उपाध्यक्ष प्रा. देवानंद कामडी, विदर्भ महिला संघटक संगीता नवघडे आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी लोकसभेचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने बैठकीला हजेरी लावली आणि जर मी निवडून आलो तर ओबीसीचे प्रश्न संसदेत लावून धरू तसेच गडचिरोली शहरात ओबीसी भवनाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या तयारीसाठी गडचिरोली येथे डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली 27 मे सोमवार रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रामध्ये ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे , ओबीसीला लावण्यात आलेली क्रिमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी, ती रद्द होईपर्यंत क्रिमिलेयरची उत्पन्न मर्यादा 20 लाख रुपये करण्यात यावी, आरक्षणाची 50% ची अट रद्द करण्यात यावी, स्वामीनाथनआयोग, मंडल आयोग व नचीपण आयोगाच्या सर्व शिफारसी लागू करण्यात याव्यात, ओबीसी प्रवर्गाचा ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा व इतर राज्य व केंद्रस्तरावरील मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यातून ओबीसी बांधव उपस्थित राहण्यासाठी तालुका निहाय चर्चा करण्यात आली यावेळी यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध शाखांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या.
ओबीसी महिला महासंघ अध्यक्ष मंगला कारेकर ,कार्याध्यक्ष लता मुरकुटे,उपाध्यक्ष ज्योती भोयर, अल्का गुरनुले ,सचिव नम्रता कुत्तरमारे,सहसचिव ऐश्वर्या लाकडे, संघटक विमल भोयर, सुधा चौधरी, प्रसिद्धी प्रमुख वंदना चाफले,सदस्य पुष्पा धंदरे,लता म्हस्के,कविता हिवरकर शहर उपाध्यक्ष नीलिमा ठाकरे,तालुका अध्यक्ष वर्षा गुरनुले.
युवती महासंघाच्या अध्यक्षपदी संतोषी सुत्रपवार तर सचिवपदी बुधाताई पोरटे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच दादाजी चुधरी यांचे नेतृत्वात जिल्हा ओबीसी महासंघाच्या कार्यकारणीत काही तुरळक फेरबदल करून जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून रामकृष्ण ताजने उपाध्यक्ष प्रा देवानंद कामडी, सचिव सुरेश भांडेकर, जिल्हा संघटक म्हणून प्रभाकर भागडकर, शंकर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली तसेच माजी महिला जिल्हाध्यक्ष सौ संगीता नवघडे यांना विदर्भ संघटक म्हणून नियुक्ती देण्यात आली. तर राहुल भांडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हा युवा महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन सर्वांना डॉ बबनराव तायवाडे यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक शेषराव येलेकर, संचालन रामकृष्ण ताजने तर आभार युती अध्यक्ष संतोषी सूत्रपवार यांनी मानले. बैठकीला पांडुरंग घोटेकर, एसटी विधाते, दादाजी चापले, गोविंद बानबले, शरद ब्राह्मणवाडे ,पंडित पुडके, भास्कर नरुले ,एड.संजय ठाकरे , शेमदेव चापले, अविनाश पाल, विजय कुत्तरमारे, विजय गीरसावळे, मधुकर विधाते, दुधराम रोहनकर, घनश्याम जक्कुलवार, रमेश चौधरी ,सुनील चडगुलवार, पुरुषोत्तम मस्के, आरमोरी वरून राजेंद्र मस्के,सौ. मस्के मंजुषा दोनाडकर, हरीश नैताम, चेतन भोयर, शुभम वैरागडे, स्वप्निल जुवारे, आशिष मने, वडसा वरून सागर वाढई, गुरुदेव नवघडे, नितीन राऊत, अरुण कुंभलवार, संदीप वाघाडे,हितेश तूपट, *चामोर्शी वरून* गंगाधर पाल, डॉ. मनीष रोहनकर, भानुदास किनेकर, भास्कर चौधरी, दिलीप चितारकर, डॉ. सुरपाम ,दुशांत कुनघाडकर, हर्षद भांडेकर, आदित्य भांडेकर धानोरा मारोती वंजारी सह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *