27 मे रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आढावा बैठक

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय महाअधिवेशन ७ आगस्ट २०२४ रोजी अमृतसर (पंजाब) येथे आयोजित करण्यात आले आहे. हे महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या अधिवेशनाला उपस्थित राहणे अपेक्षित आहे. यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे सर यांचे अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक २७ मे २०२४ रोजी दुपारी ४ वाजता कात्रटवार कॉम्प्लेक्स सभागृह चामोर्शी रोड गडचिरोली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकी मध्ये खालील विषयावर चर्चा होणार आहे.
विषय : १) प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी अधिवेशनाला हजर राहावे यासाठी तालुका पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे
२) ओबीसींच्या मागण्या संदर्भात चर्चा करणे.
३) राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध शाखातील नवीन नियुक्त्या जाहीर करणे व त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देणे.
तरी सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय युवा महासंघ, महिला महासंघ, कर्मचारी अधिकारी महासंघ, शेतकरी महासंघ, वकील महासंघ या सर्व शाखांचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी,कार्यकर्ते, हितचिंतक ,ओबीसी मधील सर्व जातीय संघटना व सभासदांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे ,जिल्हा अध्यक्ष दादाजी चूधरी, सचिव प्रा.देवानंद कामडी, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, कोषाध्यक्ष डॉ सुरेश लडके, संघटक सुरेश भांडेकर, शंकर चौधरी, युवा अध्यक्ष राहुल भांडेकर, महिला अध्यक्ष संगीता नवघडे, मंगला कारेकर, सुधा चौधरी आदींनी केले आहे.