समता सैनिक दल कन्हान शाखेचा वर्धापन दिन थाटात साजरा. वर्धापन दिना निर्मित विविध स्पर्धा व कार्यक्रम संपन्न.
कन्हान : – समता सैनिक दल कन्हान शाखेचा वर्धाप न दिना निमित्य कन्हान शाखे व्दारे ध्वजारोहण, सलामी व विविध स्पर्धाच्या आयोजना सह विविध कार्यक्रमाने १३ वा वर्धापन दिन थाटात साजरा करण्यात आला.
रविवार (दि.२९) ला सिद्धार्थ नगर स्थित बौद्ध विहार |सिद्धार्थ काॅलोनी कन्हान येथे समता सैनिक दल शाखा कन्हान च्या १३ व्या वर्धापन दिना निमित्त सैनिक दलातील भिम सैनिका आयुष्यमती सुजाता ताई नितनवरे यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता ध्वजारो हण करून जयभिम सलामी देत बुद्ध वंदना करण्यात आली. दिवसभर विविध कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित प्रश्नोतर स्पर्धा, गायन स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करून विजेत्या विद्यार्थ्यांना समता सैनिक दल नागपुर जिल्हा प्रमुख मा. प्रमोद खांडेकर, दल आधिकारी पाडुरंग सोमकुंवर ,समता सैनिक दल कन्हान प्रमुख गोपाल गोडाणे यांचे हस्ते स्पर्धेत प्रथम क्रंमाक वेदांत वाघमा रे, द्वितीय कुमारी आरोही फुलझेले व तृतीय उमंग मेक्षाम यांना पुरस्कार, शिल्ड बक्षीस देण्यात आले. तसेच सर्व उत्तीर्ण व सहभागी विद्यार्थी, विद्यार्थीनी ना प्रमाणपत्र देऊन गौरव करन मुलाना प्रोत्साहित कर ण्यात आले. तदंतर रंगारंग कार्यक्रम व जेवणाची व्यव स्था करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता कन्हान शाखेच्या सर्व सैनिकांनी जयभिम सलामी देत आयुष्य मती रमाताई वासनिक यांच्या हस्ते ध्वजउतरण करून वर्धापन दिवस थाटात साजरा करण्यात आला.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535