मोबाईल पासून मुलांना दूर ठेवा –दुर्गा प्रसाद पांडे पालक सहविचार सभा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोंढाळी –
सतत मोबाईलचा संपर्क व त्यांचे ध्वनी लहरी बालकांना अंत्यत घातक असून बारा वर्षापर्यत मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा, सध्या अकाली चस्मे लागणे, मेंदूचे कॅन्सरचे हल्ली वाढते 5 टक्के रुग्ण देशात समस्या व चिंतेची बाब असून . भविष्यात फार मोठ्या जीवहानीला सामोरे जावे लागणार असा धोक्यादायक संकेत ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दुर्गा प्रसादजी पांडे यांनी स्थानिक लाखोटीया भूतडा विद्यालयात आयोजित पालक मेळावा कार्यक्रमात मार्गदर्शनातून दिला.मेळाव्याचे अध्यक्षस्थानी लाखोटीया भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर चंपतराव बुटे,प्रमुख अतिथी पालकत्व दुर्गा प्रसाद पांडे,प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य कैलास थूल, उपस्थिती जामगढ व जुनापानी ग्रा प चे सरपंच व पालक किस्मत चव्हान, ज्ये.पर्यवेक्षक मनोज ढाले हरिष राठी, परीक्षा विभाग प्रमुख संजय आगरकर, सुनील सोलव, प्रिया धारपुरे,अतिरिक्त व स्वयंप्रेरणे बद्दल सत्कार मूर्ती गुंफेकर मॅडम यांचा सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी बहु संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.विदयार्थी भूमिकेत हर्षवर्धन ढोके, शिक्षक भूमिकेत मोहिनी भक्ते, पालक भूमिकेत हरीश राठी यांनी समुपदेशन केले.
परस्परांशी सांगड घालून स्वतःला अधिक सक्षम आणि अष्टपैलू बनवावे.
असे मार्गदर्शन उप प्राचार्य कैलास थुल यांनी केले.
संस्थेचे प्रगतीत
विदयार्थी पालक शिक्षक तीन घटका शिवाय व्यवस्थापक मंडळ चौथा घटक महत्वाचा आहे अशी माहिती प्राचार्य सुधीर बुटे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय आगरकर संचालन अमोल काळे तर आभार ज्येष्ठ शिक्षिका कुसुम वरठी यांनी मानले.