महाराष्ट्र संपादकीय हेडलाइन

किती दिवस वंशज नावावर अंधार झेलायचा?

Summary

आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी किती पिढ्या बरबाद करून यश येईल वा आमूलाग्र बदल होइल यावर चिंतन करायची वेळ डॉ.आंबेडकर यांचे तत्वज्ञानासाठी जगणाऱ्या अनुयायावर आलीय असे वाटते. प्रत्येक पिडीचे एक आयुष्य असते,उगीच भावनिक बनून लोकांना मूर्ख बनवण्यापेक्षा सर्वांना बौद्धिक कसे बनवता […]

आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी
किती पिढ्या बरबाद करून यश येईल वा आमूलाग्र बदल होइल यावर चिंतन करायची वेळ डॉ.आंबेडकर यांचे तत्वज्ञानासाठी जगणाऱ्या अनुयायावर आलीय असे वाटते. प्रत्येक पिडीचे एक आयुष्य असते,उगीच भावनिक बनून लोकांना मूर्ख बनवण्यापेक्षा सर्वांना बौद्धिक कसे बनवता येईल ह्यावर विचार केल्यास बरे होईल? आ.ऍड.प्रकाश आंबेडकर वंशज या नात्यानं खूप मोठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे तत्वज्ञान जिवंत ठेऊन जगतील ही अपेक्षा होती परंतु कधी मंदिर उघडा तर कधीही रिडल्स इन हिंदुजीम विरोधात लोकांशी समझोता व आजच्या लोकसभा निवडणुक 2024 प्रमाणेच राजकीय प्रयोग 1990 पासून राबवीत आहेत (मी स्वतः 1990 चा साक्षीदार आहे) कधी पक्ष नाव विस्तार करून तर कधी बीजेपी विचारधाऱ्या मानणाऱ्या सोबत (आ.आमदार गोपीचंद पडळकर) मिळून नवीन पक्ष स्थापन करून वा जत्रा भरवून जनतेच्या समस्येवर कुठले भाष्य न करता सामान्य जनतेला मूर्ख बनवून बरबाद करीत आहे, पुनः किती पिढ्याना बरबाद करायचं ठरवलंय हे तुम्हीचं ठरवा ? भावनिक बनण्यापेक्षा बौद्धिक बना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे तत्वज्ञान कृतीत अमल न करणारे व केवळ राजकीय स्वार्थासाठी वा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी काल पर्वा पक्षात प्रवेश केलेल्या व्यक्तीला वंचितचा एबी फॉर्म देऊन त्याना निवडणूकित उभे करने ह्यातून काय जाहीर होते ? बीजेपी हा दगड तर काँग्रेस वीट म्हणून स्वीकारले परंतु वीट आणि दगड दोन्हीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारेचे अजात शत्रू आहेत हेही सत्य आहे परंतु ह्यावर मात करण्याऐवजी केवळ संधीसाधु लोकांना स्वीकारणे म्हणजे कुठल्या डॉ.आंबेडकर तत्वज्ञानानाचा आपण स्वीकारतो ह्यावर चिंतन करुन समजून सांगल्यास बरे होईल.डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपले तत्वज्ञान जिवंत ठेवण्यासाठी आयुष्यभर लढले व राजकारणात दोनदा पराजित झालेत परंतु Scheduled Caste Federation पासून दूर गेले नाहीत मात्र वंशज स्वतः केवळ एबी फॉर्म आर्थिक व्यवहारासाठीच वापरून सामान्य जनतेच्या भावनेशी खेळ खेळीत आहेत तेंव्हा वेळीच सावध व्हा किंवा आपल्या विवेकाला जे योग्य वाटेल ते करा. राजकारण इतरांसाठी व्यवसाय आहे परंतु आम्हच्यासाठी तत्वज्ञायानुसार जगण्या मरण्याचा प्रश्न आहे.जो डॉ.बाबासाहेब आंबेडकर तत्वज्ञानाचा आर्थिक व्यवहारासाठीच वापर करतो हा कुठला स्वाभिमान वा वंशज हेही कळवा..
ऍड.डॉ.सत्यपाल कातकर, मनोवैज्ञानिक
9822722765

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *